वर्धा -/शहीद क्रांतिकारी राजगुरू यांचे स्वातंत्र्य लढयातील योगदान, युवकांना प्रेरणादायी आहे.आजच्या युगात लोकांनी राजगुरू यांची प्रेरणा घेवून देशसेवेचा वसा जोपासला तर देश प्रगत झाल्याशिवाय राहणार नाही, मातृभूला गुलामीच्या बेड्यातून मुक्त करण्याचा ध्यास लागलेला वेडा क्रन्तिकारी म्हणजे राजगुरू होय, देशसेवे साठी असे वेड प्रत्येक भारतीयाने आपल्या हृदयात जोपासले पाहिजे असे या कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते पद्ममाकर कांबळे यांनी आपल्या वक्तव्यातून सांगितले, या कार्यकमाचे प्रमुख पाहुणे कवी, गीतकार प्रकाश जिंदे यांनी राजगुरू यांच्या जीवनावर स्वरचित गीत सादर केले, तर सक्षम ऑनलाईन सेंटर तसेच बिरसा मुंडा संस्था यांच्या विद्यमाने, कुनघटकर ले आउट, जुनी म्हाडा कॉलोनी ,वर्धा येथे शहीद राजगुरू जयंती केली साजरी, कार्यक्रमाचे आयोजन बिरसा मुंडा संस्थेचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते मा राजूभाऊ आडे यांनी केले होते यशस्वीतेसाठी गजु आडे,शुभम मढावी,मयुरी मसराम, राकेश ढोले, राजूभाऊ अंबुधरे, मनिषा आडे, मयुरी पराते, प्रतिभा आडे,रंजना ढोले, त्रिनयन ढोले यांनी कार्यकामासाठी सहकार्य केले.