आदिवासी समाजातील अनेक कलाकारांच्या कला गुणांना वाव देणारा सांस्कृतिक कला महोत्सव….

0

🔥समुद्रपुर तालुक्यांतील नागरिकांनी पहिल्यांदाच अनुभवला सांस्कृतीक कला महोत्सव.🔥राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी समुद्रपूर शहरात आदिवासी कला सांस्कृतिक महोत्सवाचे केले आयोजन.🔥आदिवासी समाजाच्या सुप्त कला गुणांची आवड होती ती इतरांपर्यंत पोहोचवीत आदिवासी समाजाचा सन्मान करणे हाच या कला महोत्सवाचा हेतू,अतूल वांदीले.

🔥आदिवासी समाजाच्या कला महोत्सव बघण्यासाठी हजारोच्या संख्येने परिसरातील नागरिक समुद्रपुरात झाले दाखल.

सिंदी (रेल्वे) -/ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी समुद्रपूर तालुका आणि आदिवासी समाज बांधव यांच्या संयुक्त विद्यमाने ०९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी समाजातील कला गुणांना वाव मिळण्यासाठी सांस्कृतिक कला महोत्सवाचे आयोजन आदिवासी कला सांस्कृतिक महोत्सव, प्रबोधन मेळावा व गोंडी नृत्याचा धमाका समुद्रपूर शहरातील दिपाली मंगल कार्यालय आयोजित करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी समुद्रपूर तालुका आणि आदिवासी समाज बांधव यांच्या संयुक्त विद्यमाने ०९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी समाजातील कला गुणांना वाव मिळण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या महोत्सवाचे उद्घाटक राष्ट्रवादी कॉग्रेस आदिवासी सेल प्रदेशाध्यक्ष जयंत वानोडे, गोंडवाना युवा महिला क्रांती सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भिमाजी आडे, आदिवासी विकास परिषद अध्यक्ष नामदेव मसराम, उपाध्यक्ष गोपाल मारसकोल्हे,तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील, रॉयल गोंडवाना नृत्य पथक संस्थापक कवडुजी उईके, गोंडवाना युवा क्रांती सेना विदर्भ अध्यक्ष संजय इरपाते, आदिवासी विदर्भ क्रांती मोर्चा सचिन मसराम, आदिवासी कृ. स. जिल्हाध्यक्ष सतीश आत्राम, महिला प्रवक्ते मंगला उईके, राष्ट्रीय गोंडवाना पार्टी उपाध्यक्ष नागोराव परतेकी, नरेंद्र मसराम, विजय कंगाले, दिवाकर उईके,आदिवासी प्रदेश उपाध्यक्ष सूरज आत्राम, जिल्हा उपाध्यक्ष अशोकजी वांदिले, जिल्हा सरचिटणीस गजानन शेंडे, तालुका उपाध्यक्ष अनिल देशमुख,बूथ तालुका अध्यक्ष गणेश वैरागडे, जिल्हा सरचिटणीस सुभाष चौधरी, ओबीसी सचिव अशोक डगवार, उपसरपंच मंगेश गिरडे,तालुका अध्यक्ष तुषार थुटे,समाजसेवक रमेशजी भोयर, रोशन थुटे, विशेष उपस्थिती सुधीरजी खडसे यांची होती.आयोजक समिती दंमडुजी मडावी, उमेश नेवारे, संदीप उईके, निताताई गजबे, मंगलाताई कुमरे यांनी केले.याप्रसंगी विशेष सत्कार मूर्ती माजी जि. प.सदस्य मंदाताई चौधरी,सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी उत्तमराव तोडसाम, नगरसेविका जयाताई कोराम,उद्योजक संयोग उईके यांचे विशेष सत्कार करण्यात आले.
यावेळी आदिवासी समाजातील प्रसिद्ध गोंडी नृत्याचे सादरीकरण अनेक ग्रुपच्या माध्यमातून करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालक विनायक पाटील यांनी केले तर आभार तालुका अध्यक्ष महेश झोटिंग यांनी मानले.

दिनेश घोडमारे साहसिक news-24 सिंदी रेल्वे 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!