आम्रपाली बुद्ध विहार येथे अनोखा विवाह सोहळा….

0

🔥आम्रपाली बुद्ध विहार येथे अनोखा विवाह सोहळा.

वर्धा -/ स्थानिक आम्रपाली बुद्ध विहार सिंदी मेघे येथे एक अनोखा. विवाह सोहळा जनतेच्या वतीने संपूर्ण पाहुण्यांच्या जेवणासह वधू-वरांना लागणारे सर्व साहित्य या सर्व बाबींची पूर्तता करून करण्यात आला. चिरंजीव वर भगवान लोहकरे बोपापूर व वधू आशा नवरंगे सिंधी मेघे यांचा विवाह सोहळा नुकताच आम्रपाली बुद्ध विहाराच्या अध्यक्ष व सर्व सदस्याच्या मदतीने पार पडला. आयुष्यमान राजकुमार बाराहाते यांनी हा विवाह सोहळा त्रिशरण पंचशील व मंगलाष्टके व महापुरुषांच्या जीवनावर आधारित माहिती वधू-वरांना पुढील सह जीवनाच्या देऊन जीवनात मुलांना आपण चांगले संस्कार देऊन मुलांना घडवा व समाजाप्रती आपले दायित्व ठेवाल व अशाप्रकारे मूल्याची शिदोरी देऊन, या पद्धतीने विवाह पार पडला. या यशस्वी विवाह सोहळ्याच्या मदतीसाठी प्रबोधनकार व ज्येष्ठ समाजसेवक पद्माकर कांबळे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप वैद्य ,सुनील शेंडे, दिलीप नारायणे, मधुकर गायकवाड, मधुकर थूल ,अविनाश तामगाडगे, आदींनी अफाट प्रयत्न केले.
ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!