आर्णी तालुक्यात ‘बोगस रॉयल्टी’चे महापाप; राजकीय वरदहस्ताने महसूल लुटणारा ‘गोरखधंदा’ चव्हाट्यावर! ​जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानंतरही तहसील प्रशासन गप्प का? महिला तलाठीवर दबावाचे राजकारण; बोगसगिरीचे रॅकेट उद्ध्वस्त होणार की पुन्हा ‘सेटिंग’ लागणार?

0

🔥हेच ते रेतीमाफियाचे दलाल वैशाख वाहूरवाघ,तहसीलदार.

🔥आर्णी तालुक्यात ‘बोगस रॉयल्टी’चे महापाप; राजकीय वरदहस्ताने महसूल लुटणारा ‘गोरखधंदा’ चव्हाट्यावर!

🔥​जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानंतरही तहसील प्रशासन गप्प का?
महिला तलाठीवर दबावाचे राजकारण; बोगसगिरीचे रॅकेट उद्ध्वस्त होणार की पुन्हा ‘सेटिंग’ लागणार?

यवतमाळ,आर्णी-/ तालुक्यात मागील दोन वर्षांपासून राजरोसपणे सुरू असलेल्या बनावट वाळू रॉयल्टीच्या काळ्या साम्राज्याचा अखेर ‘दै. साहसिक’ने पर्दाफाश केला आहे. एका बड्या राजकीय नेत्याच्या छत्राखाली सुरू असलेल्या या लुटीने केवळ शासनाचा महसूलच बुडवला नाही, तर प्रशासकीय व्यवस्थेचे लक्तरे वेशीवर टांगली आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली असून, यामध्ये ‘एफआयआर’ दाखल करण्याचे धाडस लाचखोर तहसीलदार वैषाख वाहुरवाघ दाखवणार की राजकीय दबावापुढे झुकणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
​​आर्णी तहसील कार्यालयातून रॉयल्टीची मूळ पुस्तके चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, ही चोरी प्रशासनाने दडपून ठेवली होती का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. याच चोरीच्या पुस्तकांचा वापर करून निलेश राऊत (रा. कलगाव) या व्यक्तीने राजकीय नेत्यांच्या पाठबळावर बनावट रॉयल्टीचा मोठा बाजार मांडला होता. प्रधानमंत्री आवास योजनेच्या नावाखाली मिळणाऱ्या मोफत रेती टोकनचा गैरवापर करून, चिकणी क. येथील गोपाल ज्ञानेश्वर दावणे यांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली. या बोगस रॉयल्टीच्या जोरावर दिग्रस आणि परिसरात वाळूची अवैध विक्री करण्याचे रॅकेट सक्रिय होते.
​या प्रकरणातील सर्वात धक्कादायक वळण म्हणजे महिला महसूल अधिकाऱ्यांवर टाकला जाणारा दबाव. या रॅकेटमध्ये अडकलेले काही ‘पांढरपेशी’ नेते आता स्वतःची कातडी वाचवण्यासाठी धडपडत आहेत. चिकणी क. येथील महिला तलाठी यांच्यावर या नेत्यांनी दबाव टाकला असून, “त्या बोगस रॉयल्टी पुस्तकावर तुमचीच स्वाक्षरी आहे, असे तहसीलदारांना सांगा,” अशी जबरदस्ती केली जात आहे. सरकारी कर्मचाऱ्याला खोटा जबाब देण्यासाठी धमकावणे, हा प्रकार या प्रकरणाची पाळेमुळे किती खोलवर रुजलेली आहेत, हे स्पष्ट करतो. रॉयल्टी बुक चोरीला जाणे ही सामान्य बाब नाही. यात कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा हात असल्याशिवाय हे शक्य नाही. मागील दोन वर्षांपासून एका मोठ्या नेत्याच्या आशीर्वादाने हा धंदा सुरू होता. हा नेता कोण आणि त्याचे या रॅकेटशी असलेले आर्थिक हितसंबंध काय?
​कलगाव-चिकणी-दिग्रस कनेक्शन: निलेश राऊत याने किती जणांच्या नावे अशी बोगस रॉयल्टी बनवली आणि यातून किती कोटींचा महसूल बुडाला?
​जिल्हाधिकाऱ्यांचा ‘हंटर’ की तहसीलदारांची ‘ढाल’?
​जिल्हाधिकाऱ्यांनी आर्णी तहसीलला पत्र पाठवून या चोरीच्या रॉयल्टी पुस्तकांचा शोध घेण्याचे आणि दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, स्थानिक पातळीवर हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. महिला तलाठीला बळीचा बकरा बनवून मुख्य सूत्रधारांना वाचवण्याची रणनीती आखली जात आहे. ‘दै. साहसिक’ने हे प्रकरण लावून धरल्यामुळे आता भ्रष्ट अधिकाऱ्यांचे आणि नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
​जनतेचा संतप्त सवाल: गुन्हा दाखल कधी होणार?
​सामान्य नागरिकाने घरासाठी एक ट्रॉली वाळू नेली तर त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारणारे महसूल विभाग आता या ‘रॉयल्टी माफियां’वर गप्प का? हजारो ब्रास वाळूची अवैध विक्री करणाऱ्या निलेश राऊत आणि त्याच्यामागे उभ्या असलेल्या नेत्यांवर ‘कलम ४२०’ आणि ‘सरकारी कागदपत्रांची चोरी’ या अंतर्गत गुन्हा दाखल का केला जात नाही? ​तहसीलदार महोदय, जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र तुमच्या हातात आहे, पुरावे समोर आहेत आणि ‘दै. साहसिक’ने जनमताचा आरसा दाखवला आहे. आता प्रश्न इतकाच आहे की, तुम्ही त्या राजकीय दबावाच्या बेडया तोडून एफआयआर (FIR) दाखल करण्याचे धाडस दाखवता की भ्रष्टाचाराच्या या महासागरात सामील होता?
​आर्णीची जनता उत्तराच्या प्रतीक्षेत आहे!(क्रमशः)

        ब्युरो रिपोर्ट साहसिक       News-/24 आर्णी,यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!