आर्वी विधानसभेकरीता मुकेश देशमुख यांच्या उमेदवारीकरीता सर्व स्तरातून मागणी….

0

   आर्वी,साहुर -/ आर्वी विधानसभा क्षेत्राच्या उमेदवारीसाठी आष्टी तालुक्यातील मुकेश देशमुख यांच्या उमेदवारीकरीता सर्व स्तरातून मागणी होत असुन चर्चेला उधाण आले आहे आर्वी विधानसभा मतदारसंघातून होणाऱ्या ऑक्टोबर 2024 चे निवडणुकीसाठी जनसामान्य, नागरिक, शेतकरी व युवक वर्ग यांच्याकडून जनशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मुकेश  देशमुख यांना उमेदवारी दाखल करण्यासाठी सर्व स्तरावरून मागणी होत आहे.मुकेश देशमुख यांनी सन 2015 पासून जनशक्ती संघटनेच्या माध्यमातून आष्टी तालुका व आर्वी विधानसभा क्षेत्रात 80 टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारणाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी विविध आंदोलने, अनेक सामाजिक उपक्रमे राबवून गोरगरीब, शेतकरी वर्ग, व तरुण युवकांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला व त्याच अनुषंगाने आर्वी विधानसभा मतदारसंघात दगडी कार्यकर्त्यांची फौज निर्माण केली असून व त्यांनी राबवलेल्या सामाजिक उपक्रमाद्वारे त्यांच्या पाठीशी मोठा जनसमुदाय निर्माण झाला.यंदाच्या विधानसभेची उमेदवारी मिळणे बाबत कार्यकर्ता, सर्वसामान्य नागरिक, शेतकरी वर्ग व तरुण युवकांचे आग्रहाखातर उमेदवारी मिळविण्याचा मानस आहे. मात्र ते कोणत्या राजकीय पक्षाची उमेदवारी मिळण्यासाठी आग्रही आहे याबाबत चर्चांना उधाण आले आहे.मुकेश देशमुख यांच्या रूपाने आर्वी विधानसभेसाठी तरुण, तडफदार, व निस्वार्थी जनसामान्याची नाळ ओळखणारा नवीन चेहऱ्याला मतदारांच्या वतीने पसंती मिळू शकते हे विशेष.

शरद वरकड साहसिक news -/24 आष्टी,साहूर 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!