कडक इशारा “जनतेशी नीट वागा… नाहीतर औषध माझ्याकडे आहे!”-आमदार समीर मेघे…..

0

🔥कडक इशारा “जनतेशी नीट वागा… नाहीतर औषध माझ्याकडे आहे!” – आमदार समीर मेघे.

🔥वानाडोंगरी नगर परिषदेत नूतन नगराध्यक्ष पदग्रहण व नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार सोहळा संपन्न.

 हिंगणा -/ नगर परिषद वानाडोंगरी येथे मा. नगराध्यक्ष पदग्रहण व नवनिर्वाचित नगरसेवक-नगरसेविकांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. यामध्ये नगराध्यक्ष म्हणून सौ. सुनंदा बागडे, उपाध्यक्ष चंदा अजमेरे, गटनेते बालू मोरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व अपक्ष नगरसेवकांना आमदार समीर मेघे यांनी “आपण भाग्यवान आहात” असे संबोधत शुभेच्छा दिल्या.नवनिर्वाचित सदस्यांमध्ये प्रभाग क्रमांक १ दादाराव मुडे, कल्पना जागंले; २नितीन साखळे, स्वाती धडांगे; ३ विरेंद्र यादव, अश्विनी अंबादे; ४ संजय पटले, अनिता गुप्ता; ५ पुष्पा पारधी, शुभम गोहाड; ६ सौ. प्रमिलाताई यादव, सौ. चंदा काळे; ७ शेखर बाबडे, चंदा अजमेरे; ८ सौ. सुषमा घाटोळे, दीपक नासरे; ९ संतोष गुलाबे, सौ. भाग्यश्री साकोरे; १० अनुप डाखळे, सौ. प्रीती सातपुते; ११ सौ. कुसुमताई उइके, बाळुभाऊ मोरे; १२ सौ. सिंधुताई निघोट, नितीन काळे यांचा समावेश होता. तसेच नामनिर्देशित नगरसेवक म्हणून कमलेश सिंग, सचिन मेंडजोगे, रमाकांत तिवारी उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श पटले, गुणवंत मते, कृपाशंकर गुप्ता, रोशन शहाकार, यादवराव कनेर, मनोज राऊत, गजानन झाडे, भागवत काळे, संतोष कान्हेरकर यांचीही उपस्थिती होती.यावेळी आमदार समीर मेघे यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना अत्यंत कडक शब्दांत मार्गदर्शन करत थेट इशारा दिला. “जनतेशी खोटं बोलू नका, प्रत्येक नागरिकाचा फोन उचला, लोकांशी सतत संपर्क ठेवा. स्वतःला राजा समजू नका, तुम्ही सेवक आहात! नाहीतर माझ्याकडे तुमच्यासाठी ‘औषध’ आहे… आणि ते औषध मला देण्याची वेळ येऊ देऊ नका!” असे सांगत त्यांनी सभागृहात एकच खळबळ उडवून दिली.इतकेच नाही तर “प्रभागात जनतेला दिलेले शब्द पूर्ण करा, शहर विकासाकडे लक्ष द्या. राजीव नगरच्या पट्ट्यांबाबत बैठक झाली होती, त्याचा पाठपुरावा करा. नागपूर शहराचा पॅटर्न वानाडोंगरीत राबवा. निवडणूक संपली, आता सर्वांनी एकत्र राहून काम करा,” अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी नगरसेवकांना जबाबदारीची आठवण करून दिली.कार्यक्रमाचे संचालन प्रा. वाघ मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन बाळुभाऊ मोरे यांनी मानले. या कार्यक्रमाचे आयोजन नगर परिषद मुख्याधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांनी केले होते.

गजानन ढाकुलकर साहसिक News-/24 हिंगणा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!