कर्की सबस्टेशन येथे नवीन लाईन टाका; परिसरातील शेतकऱ्यांचा खासदार रक्षा खडसे यांच्याकडे मागणी
मुक्ताईनगर/ पंकज तायडे:
मुक्ताईनगर तालुक्यातील *कर्की सबस्टेशन* येथील वीज जोडणी वारंवार खंडित होऊन शेतकऱ्यांना दररोज एकूण ८ तास वीज पैकी फक्त ३ ते ४ तासच पुरवठा होत असुन, त्यामुळे परिसरातील शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे सदर कर्की सबस्टेशन येथे नवीन लाईन टाकण्यात यावी याबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी भाजपा किसान मोर्चा मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष विशाल महाजन यांच्या नेतृत्वात आज खासदार रक्षा खडसे यांना निवेदन देऊन मागणी केली.
कर्की सबस्टेशन
येथे मुक्ताईनगर येथून मुख्य वीज येत असुन, सदर वीज वाहिनी वारंवार खंडित होत असल्यामुळे शेतकऱ्यांना नियमित वीज पुरवठा होण्यास अडचणी येत आहेत. त्यानुसार नवनिर्मित पुरणाड सबस्टेशन येथून कोठे गावापर्यंत वीज वाहिनी प्रस्तावित असुन, निधी अभावी सदर कामे अपूर्ण आहे. त्याबाबत यावेळी खासदार रक्षा खडसे यांनी संबंधित महावितरण अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून सदर कामे तत्काळ मार्गी लावणे बाबत आदेश दिले. तसेच आपल्यास्तारावरून योग्यतो पाठपुरावा करणे बाबत यावेळी संबधित शेतकऱ्यांना आश्वासन दिले.
यावेळी भाजपा किसान मोर्चा मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष विशाल महाजन, भाजयुमो मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष अंकुश शांताराम चौधरी, चंदन किशोर पाटील, कन्हैय्या अशोक पाटील, योगेश गोपाळ महाजन, अजय विलास महाजन, ज्ञानेश्वर राजाराम पाटील, वसंत विश्वनाथ पाटील, मनोहर देवराम वायकोळे, रविंद्र विश्वनाथ पाटील, प्रवीण जगन्नाथ चौधरी, अतुल रामदास महाजन, शुभम कैलास पाटील, अनिल विठ्ठल महाजन, स्वप्नील जगन्नाथ पाटील, राजेश भास्कर चौधरी, सचिन भगवान चौधरी, अरुण हरी माळी, गणेश गंभीर महाजन, चेतन प्रकाश पाटील, योगेश मधुकर नारखेडे उपस्थित होते.