🔥गोठ्यातील शेतीचे सर्व साहित्य जळून झाले खाक.🔥राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले,तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटिल यांनी दिली भेट.
🔥पंचनामे करून शासनाकडून तात्काळ आथिक मदत देण्याची केली मागणी.
सिंदी (रेल्वे) -/ समुद्रपुर तालुक्यातील कवठा येथे शॉर्ट सर्किटमुळे बाबारावजी घाटे यांच्या गोठ्याला आग लागून दोन बैल, एक गाय, एक वासरू यांच्या मृत्य झाला व शेतातील साहित्य जळून खाक झाले त्यामुळे घाटे कुटूबियांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.
हि माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांना मिळताच त्यानी कवठा येथे बाबारावजी घाटे यांच्या जळालेल्या गोठ्याची पाहणी केली. गोठ्याला आग लागल्यामुळे अंदाजे रुपये चार लाखापेक्षा जास्तचे नुकसान झाले आहे. यावेळी तहसिलदार यांना दूरध्वनी व्दारे संपर्क करुन तात्काळ पंचनामे करुन राष्ट्रवादीचे अतुल वांदीले यांनी तात्काळ आर्थिक मदत मिळण्याची मागणी केली. घाटे कुटुंबियांचे सात्वन केले.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्यासह तालुका अध्यक्ष महेश झोटिग पाटिल, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, विठ्लराव लेडे, पांडुरंग घाटे, बाबाराव आडकिने, पंकज घाटे, सुधिर मेश्राम, दिवाकर घाटे, प्रविण जवांदे, जनार्धन दाते, वसंतराव घाटे, दिलीप घाटे आदी उपस्थीत होते.