के.बी.एन.एज्युकेशनल अँड सोशल वेल्फेअर सोसायटी अंतर्गत आंतरशालेय नात स्पर्धेचे आयोजन…..

0

छत्रपती संभाजीनगर -/ आंतरशालेय नात स्पर्धेचे आयोजन शहरांमधील बहुचर्चित के.बी.एन.एज्युकेशनल अँड सोशल वेल्फेअर सोसायटी यांच्यामार्फत जिन्सी पोलीस स्टेशन जवळ असलेली ऑक्झिन इंग्रजी शाळा येथे करण्यात आला होता या कार्यक्रमां मध्ये सुमारे शहरातले २७ शाळेतील ५० ते ६० विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभाग नोंदवला.लुबना अनम यांनी सूरेरहमान पठण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर कार्यक्रमाचे निमंत्रक ख्वाजा कौसर जबीन यांनी प्रास्ताविक मांडले व कार्यक्रमांमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करून कार्यक्रमाचे नियोजनाचे पालन करण्याचे उद्देश सांगण्यात आले. यावेळी के.बी.एन. एज्युकेशनल अँड सोशल वेल्फेअर सोसायटी अध्यक्ष श्री. काझी तौफिक अहमद यांनी आपल्या भाषणातून संस्थेचे उद्दिष्ट सर्वांसमोर ठेवण्यात आले आणि परिस्थितीत नुसार शिक्षणाची गरज व महत्त्व याच्यावर विद्यार्थ्यांना उजाळा देण्यात आला, शिक्षणासाठी योग्य नियोजन करण्याकरिता विविध सल्ले विद्यार्थ्यांना अध्यक्ष मार्फत देण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मोहम्मद शाकीर अब्दुल अजीम टी. आर. यांनी इस्लाम धर्माचे शेवटचे पैगंबर महंमद साहेब यांच्या अथांग जिवन शैली व्यक्त करणारे भाषण केले व स्पर्धेचे आयोजन व शिक्षण याबाबतीत संस्था चालकाचे प्रयत्नाचे कौतुक सुद्धा करण्यात आले. तसेच स्पर्धे मध्ये पर्यवेक्षक म्हणून कारी सय्यद फारुख, कारी मुक्तार अहमद शेख, कारी सय्यद मोहम्मद जियाद त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली.या स्पर्धांमध्ये तीन पारितोषिक काढण्यात आले त्यामध्ये सय्यद अबूतल, अल्फला इंग्लिश प्राथमिक शाळा यांना प्रथम पारितोषिक देण्यात आला ५००० रू रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. मोईन उलउलूम हायस्कूलची विद्यार्थिनी अफरा खान सरवर द्वितीय पारितोषिक देण्यात आले ३००० रू रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. मोईनुल उलूम हायस्कूलची विद्यार्थिनी सफुरा फय्याजोद्दिन तृतीय पारितोषिक म्हणून २००० रू रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. आणि स्पर्धा मध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच सोसायटी अंतर्गत चालणारे अजिम डी.एड. कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल कु. मैमुना, कु. शेख रेहाना, कु. मोमीन अल्मास, नदीम बागवान यांना पारितोषिक देण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. काझी नईमा सुलताना यांनी येणाऱ्या प्रमुख पाहुण्यांचे तसेच स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्यांचे सर्वांचे आभार प्रदर्शन मानले. सूत्रसंचालन म्हणून डीएड कॉलेजचे विद्यार्थिनी कु. रेहाना शेख व कु. मोमीन अल्मास यांनी आपले कर्तव्य पूर्ण केले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संस्थेचे अध्यक्ष काझी तौफिक अहमद, डॉ. काझी नईमा सुलताना आणि संपूर्ण संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रमाने कार्यक्रम यशस्वी पार पाडले.

अर्षद शेख साहसिक news -/24 छत्रपती संभाजीनगर 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!