गट शिक्षणाधिकारी महिलेशी असभ्य वागणूक करणाऱ्या वासुदेव डायगव्हाणे यांचे निलंबन केव्हा?

0

शहर प्रतिनिधी/ वर्धा

जि प वर्धा येथे डॅमेज कंट्रोल मास्तर म्हणून प्रसिद्धीच्या झोतात असलेला शिक्षक वासुदेव डायगव्हाणे याने सेलू येथील पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पद्मा तायडे यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन असभ्य शिवीगाळ केली. सदर घटनेची तक्रार गटशिक्षणाधिकारी तायडे यांनी जि प अध्यक्ष सौ सरिता गाखरे व जि प मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओंबासे यांना लेखी केली. या तक्रारीवरून डॉ.ओंबासे यांनी वासुदेव डायगव्हाणे या मास्तरला तीन दिवसात घडलेल्या घटनेचे स्पष्टीकरण मागितले परंतु, मुदत असलेल्या वासुदेवने तीन दिवसात स्पष्टीकरण दिले नाही, यामुळे त्या मास्तरचे निलंबन करण्याचा प्रस्ताव जिपच्या शिक्षण व आरोग्य सभापती मृणाल माटे व त्यांच्या सदस्यांनी घेतला आहे. दिवाळी सुट्टी असल्यामुळे वासुदेव ला थोडे जीवनदान मिळाले आहे. जीपमध्ये अध्यक्षपदी सौ सरिता गाखरे , उपाध्यक्षपदी सौ वैशाली येरावार, सभापती मृणाल माटे, शिक्षण सभापती सरस्वती मडावी महिला व बालकल्याण याच्यावर महिला पदाधिकारी जबाबदार पदावर असताना या डॅमेज कंट्रोल मास्तरांनी एका महिला गट शिक्षण अधिकारी यांच्याशी असभ्य वागणूक केली, असताना या वासुदेव ची बडतर्फ करण्याची मागणी महिला कर्मचाऱ्यांनी केली आहे. तसा ठराव सुद्धा शिक्षण व आरोग्य सभापती यांनी मांडला आहे .त्यावर जि प ला मुख्याधिकारी यांची स्वाक्षरी घेणे बाकी आहे.तसेच जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी या शिक्षकावर फौजदारी कारवाई करण्याची परवानगी गटशिक्षण अधिकारी पद्मा तायडे यांना दिली आहे. यामुळे डॅमेज कंट्रोल मास्तर वर कोणत्याही शनि पोलिसात गुन्हा नोंद होऊन कारवाई होऊ शकते. हा डॅमेज मास्तर डॅमेज राजकीय लोकांच्या संपर्कात असून राजकीय लोकांना पाच पन्नास हजार रुपये देऊन पोलिस तक्रार व निलंबन होऊ नये यासाठी संबंधित तक्रारकर्त्या महिलेचे नातेवाईकांवर दबाव टाकत आहे, तसेच निलंबन होऊ नये यासाठी अधिकारी वर्ग सुद्धा राजकीय दबाव यांचा वापर होत आहे. तेव्हा या गंभीर बाबीची दखल घेत डॅमेज मास्टर वासुदेवाचे निलंबन करण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे. जिपचे मुख्याधिकारी यांनी या डॅमेज वासुदेव ला तडकाफडकी बडतर्फ किंवा निलंबित करून पती-पत्नी एकत्रीकरण याचा नियम लागू करून या डॅमेज कंट्रोल वासुदेव ला आष्टी प. स.मध्ये बदली करावी जेणेकरून पती-पत्नी एकत्रीकरण नियमाचा फायदा होईल. आणि “खुटी उपाड खुटी घाल” प्रवृत्तीला आळा बसेल, अशी भावना कर्मचारीवर्ग यांनी व्यक्त केली आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!