ग्रामीण भागातचं खरी पत्रकारीता जीवंत – अशोक वानखेडे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वार्तालाप मध्ये पत्रकारितेतील सद्यस्थितीवर मंथन
प्रतिनिधी / औरंगाबाद:
सध्या पत्रकारीचे सर्वच आयाम बदलले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानामूळे या क्षेत्रात अनेक नव्या संधी उपलब्ध झाल्यामूळे चांगले लोक पत्रकारीतेत येत आहेत. तांत्रिक बाबतीत पत्रकारीतेला चांगले दिवस आले असले तरी महानगरातली खरी पत्रकारीता संपली आहे. येथे बनावट, नकली पत्रकारीती सूरू झाली आहे. साध्या ग्रामीण भागातच खरी पत्रकारीतेता जिवंत आहे, असे प्रतिपादन आँल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन, नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे यांनी केले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईच्या औरंगाबादेतील विभागीय कार्यालयात शनिवारी अशोक वानखेडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी झालेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना अशोक वानखेडे म्हणाले की, अलिकडे कुणालाही प्रश्न विचारलेले आवडत नाही. राजकारणाचे स्वरूप बदलले आहे. एकाधिकारशाही वाढली आहे. मी अटलबिहारी वाजपेयींना भर कार्यक्रमात एखाद्या निर्णयाला विरोध केल्याचे बघीतले आहे. त्यामुळे पूर्वी विरोधात प्रश्न विचारणाऱ्यालाही किंमत होती. अलिकेडे पत्रकार सत्ताधाऱ्यांना विरोधात प्रश्न विचारात नाहीत. त्याचे कारण म्हणजे, ते स्वत:च कुठेतरी कमी पडतात. तुमचा स्वार्थ पुढे आला की, तुमचा आवाज आपोआप दबुन जातो, त्यामुळे पत्रकारांनी आपल्या गरजा कमी ठेवाव्यात असा वडिलकीचा सल्लाही वानखेडे यांनी दिला. सकारात्मक पत्रकारितेला समाज उचलुन धरतो, देशात, ग्रामिणभागात अनेक यशगाथा आहेत त्या समाजासमोर मांडल्या तर समाजाची प्रगतीतर होतेच, परंतु आपलाही दर्जा आपोआप वाढतो. दिल्ली सारखा महानगरात पत्रकारिता करतांना अनेक बऱ्या-वाईट गोष्टींचा अनुभव घेवून समाजाभिमुख पत्रकारिता करण्यावर मी कायम भर दिल्यामुळे सर्वच पक्षात माझे चांगले संबंध आहेत आिण याच संबंधामुळे मला दररोज नवनविन बातम्या व माहिती मिळते. त्यामुळे पत्रकारांनी सर्वच क्षेत्रातील व्यक्तींशी आपले संबंध वाढविले पाहिजेत, पत्रकारिता करताना तुमचे जेवढे संबंध जास्त तेवढे तुम्ही चांगले काम करू शकता. सोशल मिडियामुळे ग्रामिण भागात पत्रकारिता करणाऱ्यांनी विकासात्मक कामावर भर दिला पाहिजे. सर्व सामान्य जनताच मतदान करते, त्यामुळे हिच खरी लोकशाही आहे. चौथ स्तंभ म्हणून काम करणाऱ्या पत्रकारांनी कायम सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर फोकस टाकावा जेणे करून लोकशाहीला धक्का लागणार नाही, असे आवाहनही शेवटी अशोक वानखेडे यांनी केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ.प्रभू गोरे, जिल्हा उपाध्यक्ष छबुराव ताके, कोषाध्यक्ष मुकेश मुंदडा, प्रसिध्दी प्रमुख मनोज पाटणी, संजय व्यापारी, राजेंद्र शहापूरकर, शिवानंद चक्करवार, रसपालसिंग अट्टल, दिपक काकडे, सुमित शिंगी, आदित्य बरांडे, आदिंची उपस्थिती होती.