जय जय भिकाराम महाराज यांच्या ७२ वा जन्मशताब्दी मोहोत्सवाला आष्टा वढाळा येथे भक्ताची तुडुंब गर्दी..२२ जानेवारी ते २९ जानेवारी पर्यंत होणार जन्मोत्सव साजरा….

0

🔥जय जय भिकाराम महाराज यांच्या ७२ वा जन्मशताब्दी मोहोत्सवाला आष्टा वढाळा येथे भक्ताची तुडुंब गर्दी..

🔥श्री संत योगी भिकाराम महाराज यांचा ७२ वा जन्मोत्सव सोहळा २२ ते २९ जानेवारी पर्यंत साजरा करण्यात येणार.

वर्धा – / नदिच्या तीरावती बसलेले एक छोटसं आष्टा वढाळा गाव आहे याच गावामध्ये एका छोट्या कुटुंबामध्ये आई यशोदा माता व पिता गोपाळराव यांच्या कुटुंबामध्ये आई यशोदा मातेच्या पोटी अन्नपूर्णा मातेच्या कृपाप्रसादाने श्री संत योगी भिकाराम महाराज यांचा जन्म दिनांक २९ जानेवारी १९५४ या दिवशी बाबांचा जन्म झाला बाबांना लहानपणापासूनच राहण्याचे व खाण्याचे काहीच भान नसायचे बाबा रानोवनी फिरायचे अनवाणी पायाने फिरायचे नदीच्या तीरावरती नग्न अवस्थेत दिगंबर अवस्था असून नदीच्या तीराने फिरायचे गावांमध्ये सगळीकडे भीतीचे वातावरण पसरले होते बाबांना कोणी वेड म्हणायचं कोणी पागल म्हणायचं कुणी त्यांना खायला सुद्धा काही द्यायचं नाही म्हणूनच बाबा मिळेल ते खायचे नाही मिळालं तर बेशरमचा पाला सुद्धा बाबांनी खाल्ला गटारातलं पाणी सुद्धा

बाबा पिले भीतीमुळे कोणी जवळ जात नव्हतं पंधरा वर्षे बाबांच्या पायामध्ये बेड्या होत्या काही कालावधी असाच निघून गेला बाबा बोलायचे पण लोक त्यांना वेड समजायचे पण बाबांचे शब्द हे अक्षरशः सत्य व्हायचे म्हणूनच काही लोकांना बाबांची प्रचिती यायला सुरुवात झाली बाबांना नागपूरच्या वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा नेलं पण शेवटी ते देवच ना शंकराचा अवतारचना पण तिथल्या मशिनी शॉक देताना संपूर्ण बंद झाल्या हे एकदा नाही झाले दोनदा मशीन बंद पडल्या लोकांना प्रचिती यायला लागले चमत्कार वाटला अशाच प्रकारे बाबांनी बरेचसे चमत्कार केले म्हणून वर्धा तीरी बसलेले एक छोटेसे आष्टा वढाळा हे गाव आज तीर्थक्षेत्राच्या नावाने ओळखले जातात या संतांना लोक वेडे म्हणून समजायचे त्यांना राहायला काही नव्हतं त्यांना खायला काही नव्हतं आज बाबांना चांदीच्या ताटामध्ये जेवण आहे

🔥अंथरून नव्हतो पांघरून नव्हतं जमिनीचा.

अंथरून करायचे आणि आकाशाचे पांघरूण करायचे आज त्याच बाबांच्या चमत्कारामुळे आशीर्वादामुळे बाबांच्या प्रचितीमुळे इथे येणारा एकही भक्त उपाशी राहत नाही नावाने जरी भिकाराम महाराज असले तरी मनाची श्रीमंती आहे बाबांचे अनेक चमत्कार आहेत म्हणूनच दरवर्षी २२ जानेवारी ते २९ जानेवारी या कालावधीमध्ये बाबांचा जन्मोत्सव सोहळा

मोठ्या थाटामाटाने उत्साहात साजरा केला जातो या उत्सवामध्ये विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम तथा कीर्तने प्रवचने काकडा हरिपाठ श्रीमद् भागवत कथा याचे आयोजन सुद्धा केले जाते मोठे मोठे प्रसिद्ध कीर्तनकार प्रवचनकार गायनाचार्य कथाकार या ठिकाणी बाबांच्या दरबारामध्ये सेवा देतात २९ जानेवारीला भव्य दिव्य महाप्रसादाचे आयोजन असते २२ जानेवारी ते २९ जानेवारी या कालावधीमध्ये चालत असणारा हा जन्मोत्सव सोहळा या सोहळ्यात अखंड अन्नदान आणि विविध प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात आज श्री क्षेत्र आष्टा वडाळा भिकाजी हे नुसतं गाव नाही तर बाबांच्या कृपा आशीर्वादाने पावन आणि पुनीत झालेलं तीर्थक्षेत्र झालेला आहे यांच बाबांना वेळेनुसार लोकांनी त्रास दिला बाबांना का त्यांना सुद्धा मारलं आज

बाबांच्या दर्शनासाठी चरण परशासाठी श्री क्षेत्र आष्टा वढाळा या ठिकाणी लाखो भाविक भक्ताची गर्दी होते नावाने भिकाराम मनाने श्रीमंत बाबांची श्रीमंती बघितली तर मनाची श्रीमंती एवढी आहे की त्याला म्हणतात ना की संतांच्या आजही बाबांच्या शब्दांमध्ये तीच ताकद तोच आशीर्वाद आहे म्हणून बाबांच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेली ही आप्त वढाळा भूमी या भूमीची ही माहिती आपण या भूमीला आवश्यक पदस्पर्श लावावेत हे साध्य भूमी नसून बाबाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे दिनांक २२ जानेवारी ते २९ जानेवारी या कालावधीमध्ये चालत असणारा हा जन्मोत्सव सोहळा धार्मिक सोहळ्याचा सर्व भक्तगण यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती श्री संत भिकाराम महाराज ट्रस्ट आष्टा वढाळा यांनी केली आहे.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!