जवाहरलाल दर्डा अभियांत्रिका महाविद्यालय  बनले पीडित महिला लैंगिक शोषणाचा अड्डा? वादग्रस्त किशोर दर्डाच्या दबावाखाली पोलीस प्रशासन हतबल…!

0

🔥हेच ते जवाहरलाल दर्डा अभियांत्रिका महाविद्यालय
 बनले पीडित महिला लैंगिक शोषणाचा अड्डा? वादग्रस्त किशोर दर्डाच्या दबावाखाली पोलीस प्रशासन हतबल.!🔥हेच ते गुन्हेगाराला पाठीशी घालणारे किशोर दर्डा लैंगिक शोषण चे आरोपी प्रिंसिपल यांना पाठीशी घालत आहे.

वर्धा -/ विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या यवतमाळ शहरातील शैक्षणिक क्षेत्र एका संतापजनक घटनेने हादरले आहे.(JDIT) जवाहरलाल दर्डा अभियांत्रिका महाविद्यालय इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एका विभाग प्रमुखाने (HOD) विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणाला आता राजकीय आणि गुन्हेगारी वळण लागले आहे.फोकमत चा किशोर दर्डा आपल्या ‘दबावतंत्राचा’ वापर करून हे गंभीर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा खळबळजनक आरोप होत आहे.

​२ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी जेडीआयटी कॉलेजमध्ये एका नराधम विभाग प्रमुखाने सर्व मर्यादा ओलांडल्या. पीडित विद्यार्थिनीशी तिच्या संमतीशिवाय लगट करण्याचा आणि तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न या प्राध्यापकाने केला. केवळ शारीरिक लगटच नाही, तर या विकृत प्राध्यापकाने पीडितेच्या मोबाईलवर अत्यंत अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवून तिचा छळ केला होता.
​जेव्हा ही बाब महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आली, तेव्हा त्यांनी पीडितेची विचारपूस केली. पीडित विद्यार्थिनीने डोळ्यात पाणी आणून आपल्यावर ओढवलेला प्रसंग सांगितला आणि पुराव्यासहित ते अश्लील मेसेज विद्यार्थ्यांना दाखवले. आपल्या मैत्रिणीसोबत झालेला हा नीच प्रकार पाहून विद्यार्थ्यांचा संताप अनावर झाला.
​​संतापलेला विद्यार्थ्यांचा गट तातडीने संबंधित HOD च्या केबिनमध्ये घुसला. विद्यार्थ्यांनी त्याला मेसेजबाबत जाब विचारला असता, त्या नराधमाने माफी मागण्याऐवजी उलट उत्तरे देत उद्धटपणा केला. यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली. कायद्याची वाट न पाहता विद्यार्थ्यांनी त्या विकृत प्राध्यापकाला लाथाबुक्क्यांनी आणि चपलेने तुडवले. या ‘धुलाई’चा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला असून, शहरात या घटनेचीच चर्चा आहे.
​​या घटनेला आता चार दिवस उलटून गेले आहेत, तरीही संबंधित नराधम विभाग प्रमुख अजय याच्यावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे, महाविद्यालयाचे संचालक किशोर दर्डा यांनी महाविद्यालयातील तोडफोडीबाबत किंवा प्राध्यापकावर झालेल्या हल्ल्याबाबत कोणतीही तक्रार दिलेली नाही. ​​पीडितेच्या कुटुंबावर दहशत ज्या मुलीचा विनयभंग झाला, तिचे कुटुंब सध्या प्रचंड दहशतीत आहे. त्यांना गप्प राहण्यासाठी धमकावले जात असल्याची चर्चा आहे. ​गुन्हेगारी पार्श्वभूमी किशोर दर्डा यांची पार्श्वभूमी आधीच वादग्रस्त राहिली आहे. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगून आल्यानंतरही त्यांच्या गुन्हेगारी वृत्तीत सुधारणा झालेली नाही, उलट ती वाढतच चालली आहे.
​मालमत्ता बळकावणे बेकायदेशीरपणे मालमत्ता हडप करण्याचे कारनामे किशोर दर्डा यांच्या नावावर आधीच आहेत. आता शैक्षणिक संस्थेतील लैंगिक शोषणासारखा गंभीर प्रकार दडपण्यासाठी ते आपल्या पदाचा आणि पैशाचा गैरवापर करत आहेत. ​​जेडीआयटी कॉलेजमध्ये अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. याआधीही २ जानेवारीला अशाच प्रकारचा संशयास्पद प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे हे अभियांत्रिकी महाविद्यालय राहिले नसून ‘लैंगिक शोषणाचा अड्डा’ बनले आहे की काय? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. या सर्व काळ्या कारनाम्यांना पांघरूण घालण्याचे काम किशोर दर्डा करत असल्यामुळे
यवतमाळकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
संबंधित विभाग प्रमुख अजयवर तातडीने विनयभंगाचा गुन्हा दाखल व्हावा.पीडितेच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावे.
या प्रकरणाच्या चौकशीत अडथळा आणणाऱ्या किशोर दर्डाची सखोल चौकशी व्हावी. ​यवतमाळच्या लेकीबाळी सुरक्षित नसतील, तर अशा शिक्षण संस्थांना टाळे ठोकण्याची वेळ आली आहे. आता प्रशासन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.(क्रमशः)
“कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, मग तो कितीही मोठा धनदांडगा असो. जर पीडितेला न्याय मिळाला नाही, तर यवतमाळची जनता रस्त्यावर उतरून किशोर दर्डा आणि त्या विकृत प्राध्यापकाला धडा शिकवेल.” – स्थानिक नागरिक

पोलीसांनी वारंवार या घटनेचा आढावा घेतला विशेष म्हणजे यासाठी लोहारा पोलीस स्टेशनचे पथक आज सुद्धा पिडीताच्या घरी जावुन तक्रार देण्यास सांगितले मात्र यामध्ये पिडीता ही सज्ञान असल्याने कोणताही अधिकार पोलीसांना गुन्हा दाखल करण्यासाठी हक्क नसतो घटना खरी असुन याबाबत चौकशी सुद्धा करण्यात आली संबधीत संस्थाचालकाला सुद्धा तुम्ही सुद्धा यात तक्रार द्या असे सांगितले मात्र कुणीही तक्रार देण्यास तयार नसल्याने सध्या परस्थितीवर पोलीस लक्ष ठेवुन आहे.
लोहारा पोलीस स्टेशन ठाणेदार
रोहीत चौधरी

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!