आष्टी साहुर /आष्टी तालुक्यातील जामगाव याठिकाणी असलेला प्रवासी निवारा प्रवाशांचा जीव घेणार का? अशा प्रकारचा प्रश्न जामगाव येथील नागरिक करीत आहे येथील प्रवासी निवारा पुर्णपणे खराब झाला असून सिमेंटचे भाग खाली पडत आहे व त्यातील लोहा सुध्दा बाहेर निघाला आहे त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे उन्हात व पावसात नागरिक प्रवासी निवारा चा सहारा घेतात परंतु नागरिकांच्या जीवाला धोका असल्याने उन्हात व पावसात प्रवासी खुल्या जागेवर उभे असतात या समस्येकडे मात्र संबंधित अधिकारी लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील नागरिक करीत आहे तीन वर्षांपासून हा प्रवासी निवारा खराब झाला असून याची आजपर्यंत कुठल्याही प्रकारची दुरूस्ती सुध्दा करण्यात आली नाही या भागातील लोकप्रतिनिधी कुंभकर्ण अवस्थेत असल्याने जोपर्यंत जाग येणार नाही तोपर्यंत प्रवासी निवाराचे काम होणार नसल्याची चर्चा नागरिक करीत असल्याचे दिसून आले.