जिल्हा परिषद कै.गो.वाघ केंद्र शाळा आष्टी येथे सांस्कृतिक महोत्सव व बक्षीस वितरण सोहळा…..

0

आष्टी शहीद -/ जिल्हा परिषद कै.गो.वाघ केंद्र शाळा आष्टी येथे सांस्कृतिक महोत्सव व बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात व बहुसंख्य पालकांच्या व उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष  राजेंद्र जवळेकर, उपाध्यक्ष सौ गीता माहोरे, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, सोमेश्वर बालपांडे,शेख सोजर, रवींद्रवानखेडे, सौ.भावना बुटले ,सौ.श्रुती बेलेकर,सौ,अनिता सनेसर,सौ अर्चना बोरेकर , प्राचार्य शहजाद अहमद सर, सुनील मांडवे सर , महेंद्र सांबारतोडे सर,सौ कोकाटे मॅडम,सौ,सावरकर मॅडम,विषय तज्ञ नीचत मॅडम ,शाळेच्या मुखयाध्यापिका सौ संध्या ठाकरे मॅडम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.या प्रसंगी विविध सहशालेय उपक्रम , खेळ व विविध स्पर्धा यामध्ये विशेष नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले, सुनील मांडवे सर यांनी जिल्हा परिषद शाळेतून घेतलेले शिक्षण हे कसे विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनात उपयोगी ठरते याविषयी मार्गदर्शन केले. जवाहर उर्दू शाळेचे प्राचार्य शहजाद अहमद सर यांनी मुलांच्या जीवनात आनंद किती महत्वाचा आहे हे समजावून सांगितले . या प्रसंगी वर्ग 1 ते 4 च्या विद्यार्थ्यांनी मनमोहक नृत्य प्रकार सादर केले.कार्यक्रमाचे नियोजन सौ पदमा झामडे यांनी केले आणि संचालन श्री सचिन नागपुरे सर यांनी केले.प्रास्ताविक सौ.संध्या ठाकरे मॅडम व आभार प्रदर्शन श्री मंगेश खंडार यांनी केले.

नरेश भार्गव साहसिक NEWS-/24 आष्टी शहीद 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!