वर्धा /बजाज फौंडेशन वर्धा तर्फ़े एकूण रकमेच्या ३० टक्के निधी म्हणजे ३३५००/-रु निधी भरून बोर्ड प्राप्त होणार होता,परंतु शाळेमध्ये एवढा निधी नसल्याने शाळेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक यांनी ग्रामपंचायत ,साटोडा शी संपर्क साधला, सरपंच मा.बादल उर्फ हरीश विरुटकर,सदस्य,अजय जानवे,ग्राम विस्तार अधीकारी मा.चौहान साहेब यांनी विद्याथ्यानचे हित लक्षात घेऊन अशा प्रकारच्या डिजिटल शैक्षणिक साधन उपलब्ध करून देऊ असा होकार दिला व लगेच ३३५०० रु चा धनादेश दिला व शाळेसाठी सुविधा उपलब्द्ध करून दिली.तसेच या साधनांची किंमत एक लाख १६ हजार रुपये आहे.यावेळी मुख्याध्यापक रवींद्र पावडे यांनी ग्रामपंचायत चे मनस्वी आभार मानले तसेच मुख्य प्रेरक म्हणून मनीष जगताप यांना पण धन्यवाद दिले.