झरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रवींद्र कुमार सागळे व त्यांचा सहकारी शिक्षण अधिकारी निलेश खैरनार या दोघांनी प्रा. शालेय शौचालय व भारत स्वछ मिशन शौचालयाच्या 59 कामात केला लाखोंचा घोटाळा……

0

  🔥हेच ते नियमबाह्य पद्धतीने कामे करून १० टक्के कमिशन लाटणारे, झरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नरेंद्र कुमार सागळे.       🔥हेच ते गटविकास अधिकारी यांच्या भ्रष्ट्राचारात सहभागी मित्र, झरी पंचायत समितीचे शिक्षण अधिकारी निलेश खैरनार.

🔥झरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रवींद्र कुमार सागळे व त्यांचा सहकारी शिक्षण अधिकारी निलेश खैरनार या दोघांनी प्रा. शालेय शौचालय व भारत स्वछ मिशन शौचालयाच्या 59 कामात केला लाखोंचा घोटाळा.

🔥गटविकास अधिकारी रवींद्र कुमार सागळे व शिक्षण अधिकारी निलेश खैरनार यांनी प्रा. शालेय शौचालय व भारत स्वछ मिशन शौचालयात त्यांच्या हस्तकामार्फत ई (E) निविदा मध्ये केला प्रचंड घोटाळा

🔥झरी चे गटविकास अधिकारी व शिक्षण अधिकारी यांनी प्रा. शालेय शौचालयाचे 43 कामे व भारत स्वछ मिशन शौचालयाचे 16 कामे असे 59 कामे नियमाची “ऐशी तैशी”! करून आपल्या मर्जीतील लोकांना 10 टक्के कमिशन घेऊन केले वाटप.

🔥प्रा. शालेय शौचालय व भारत स्वछ मिशन शौचालय कामात रवींद्र कुमार सागळे व निलेश खैरनारची कमिशन खोरी – परिसरात बेरोजगार अभियंतानां काम मिळेना.

🔥महाराष्ट्र शासन, ग्राम विकास मंत्रालयाच्या परिपत्रकास लाचखोर गटविकास अधिकारी रवींद्र सागळे व शिक्षण अधिकारी निलेश खैरनार या दोघांनी दाखविली केराची टोपली.

🔥झरी पंचायत समितीत कमिशनराज चव्हाट्यावर – गटविकास अधिकारी रवींद्र कुमार सागळे व त्याचा सहकारी शिक्षण अधिकारी निलेश खैरनार यांच्या आशीर्वादाने मर्जीतील ठेकेदार मालामाल

🔥झरी पंचायत समितीत प्रा. शालेय शौचालय व भारत स्वच्छ मिशन शौचालय योजने सह अन्य योजनेत प्रचंड गैरप्रकार

🔥गटविकास अधिकारी रवींद्र सागळे व त्याचा सहकारी शिक्षण अधिकारी निलेश खैरनार यांनी भारत स्वच्छ मिशन सह अन्य योजनेत कमिशनखोरी व बोगसगिरीची वरिष्ठांनी तात्काळ चौकशी करून कारवाई करण्याची मागणी

🔥झरी पंचायत समितीत कमिशनराज आणि बोगसगिरीचा दैनिक साहसिक करणार पर्दाफाश

 यवतमाळ -/ सध्या अधिकारी वर्गात लाचेचा पैसा कमविण्याची स्पर्धा लागली आहे. कोणता अधिकारी किती पैसे कमवितो याकडे प्रत्येक अधिकारी लक्ष ठेवून आहे. असाच काहीसा प्रकार यवतमाळ जिल्ह्यातील झरी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी रवींद्र कुमार सागळे व त्यांचे सहकारी शिक्षण अधिकारी निलेश खैरनार *चोर चोर मौसरे भाऊ* यांच्यासोबत घडत आहेत.
सध्या झरी पंचायत समितीलाही भ्रष्टाचाराची कीड लागल्याने येथील *लाचखोर* गटविकास अधिकारी नरेंद्र कुमार सागळे व व त्यांचे सहकारी शिक्षण अधिकारी निलेश खैरनार यांचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर येऊन झरी पंचायत समितीत प्रा. शालेय शौचालय व भारत स्वच्छ मिशन शौचालय कामा सह अन्य योजनेमध्ये प्रचंड घोटाळा झाल्याची माहिती समोर आल्याने हा संपूर्ण गोंधळ झरी तालुक्यात चर्चित झाला आहे.
महाराष्ट्र शासन पंचायत समिती मार्फत जनतेच्या उत्थानासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवित आहे या कल्याणकारी योजनेचा लाभ गरजू लोकांना कमी व येथील काही भ्रष्ट अधिकारी कर्मचारी व ठेकेदारांना जास्त मिळताना दिसत आहे.
पंचायत समितीचा मुखिया जर भ्रष्ट कारभाराला प्रोत्साहन देत असेल तर त्यांचे हाताखाली कामे करणारे कर्मचारी सुद्धा मुखीयाचा पावलावर पाऊल टाकून नक्कीच बिनधास्त भ्रष्टाचार करणार.
सध्या असाच प्रकार झरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नरेंद्र कुमार साबळे व शिक्षण अधिकारी निलेश खैरनार यांचा चालला आहे.
येथील गटविकास अधिकारी नरेंद्र कुमार सागळे यांच्या आशीर्वादाने येथील अन्य कल्याणकारी योजनेत नियमाची *”ऐशी तैशी”!* करून प्रा. शौचालय व भारत स्वच्छ मिशन कामात 10 टक्के कमिशन घेऊन प्रचंड घोटाळा झाल्याचे कारनामे समोर आले आहे.
झरी पंचायत समिती अंतर्गत 43 शौचालय प्रती चार लक्ष रुपये प्रमाणे एक करोड बाहत्तर लक्ष रुपयाची E निविदा दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी प्रकाशित झाली.
गटविकास अधिकारी रवींद्र कुमार सागळे आणि शिक्षण अधिकारी निलेश खैरनार यानी त्याचा हस्तकामार्फत E निविदा मध्ये प्रचंड घोळ केला. यवतमाळ जिल्हा वार्षिक योजनेचे सन 2024 – 25 चे सर्व साधारण योजनेचे सदर काम पंचायत समिती झरी ची E निविदा दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी निविदा पोर्टल वर टाकली ती निविदा 3 सप्टेंबर 2025 ला प्रकाशित झाली.
यातील काही निविदा दिनांक 4 सप्टें / 2025 ला प्रकाशित झाली या निविदा उघडण्याचा uplod करण्याचा कालावधी नियमाने 7 दिवसाचा असतो परंतु या निविदा उघडण्यासाठी पाच दिवसाचा कालावधी दिला.
दिनांक 2 सप्टेंबरला रविवार 3 आणि चार Office पाच तारखेला गुरुनानक जयंतीची सुटी 8 तारखेला निविदा open याच काळात मुख्याध्यापक प्राथमिक शाळा येथून मौका तपासनी अहवाल कंत्राटदाराने आणायचा आशि अट होती 43 शाळा NOC आणायची कशी
जर शौचालय जागेचा मौका तपासनी अहवाल आणायचा तर मग या प्रा. शौचालय कामाचे प्रकलन प्रशासकीय मान्यता तांत्रीक मान्यता कशी भेटली.
शाळा समितीचा ठराव गाव नमुना 8 अ. पाहिजे असताना मौका तपासणी अहवाल मुद्दाम अटी व शर्ती मध्ये नमुद केले अशे हे विशेष. ई (E ) निविदा प्रकाशित तर केल्या पण याचात अनेक घोळ झाले.
या माध्यमातुन आपला हितचिंतक यांना काम वाटप करण्याची पद्धत सोपी करून घेतली. 43 शौचालय एक करोड बाहत्तर लक्ष रुपयाचे 16 शौचालय एकून 59 कामे काही मोजक्या चार ते पाच कंत्राटदारांना कामे वाटप करून दिली.
Sedul दराप्रमाणे कुणीही या कामाचे निविदा कमि दरात घेतल्या नाही कारण मॅनेज असलेले काम वाटून घेतले या पैकी इरफान राजानी सुबेअ कंत्राटदार पांढरकवडा यांना बेलमपल्ली, परसोली पिंप्रळ, पठार,( बु ) अंबेझरी ई , पाटण अशी सात कामे बेरोजगार अभियंतानां 10 टक्के कमिशन घेऊन कामे दिली.
वास्तविक सुबेअ यांना मर्यादेपेक्षा जास्त कामे दिली त्यामुळे परिसरातील बेरोजगार कंत्राटदार वर काम नसल्याने उपासमारीची पाळी येत आहे गटविकास अधिकारी हे धनदांडग्यांना कमिशन घेऊन कामे वाटप करत आहे यामुळे परिसरातील कंत्राटदारावर अन्याय होत आहे.
महाराष्ट्र शासन ग्रामविकास मंत्रालय शासन निर्णय ग्रा.स.य. 2020 / प्र. क्र.70/ बांधकाम – 2 मंत्रालय बांधकाम भवन -२ दिनांक 5 एप्रिल 2023 या परिपत्रकात काम वाटप व मार्गदर्शक सूचना नमूद केले आहेत शासन परिपत्रकात हे नियम बंधनकारक असताना गटविकास अधिकारी रवींद्र कुमार सागळे व त्यांचे सहकारी शिक्षण अधिकारी निलेश खैरनार या दोघांनी 10 टक्के कमिशन पोटी यांनी आपले अधिकाराचा दुरुपयोग करून शासन परिपत्रकास केराची टोपली दाखवली.
या *लाचखोर* अधिकाऱ्यांनी आपले स्वार्थ साधण्यासाठी कामाचे सोपस्कार करून 10 टक्के लाचखोरी 1 करोड 72 लाख रुपये आणि SBM कामाचे अंदाजे 40 लाख रुपये कामाचे 10 टक्के कमिशन मिळवून घेतली हे सूर्य प्रकाशा एवढे सत्य दिसत आहे.
सदर निविदा महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग यांचे परीपत्रक नुसार कामाचे वाटप सर्व कंत्राटदारांना समान प्रमाणात वाटप झालेले नाही.
शासन निर्णय नुसार ग्रा.स.यो 2020 / प्र.क्र 70 बांधकाम 2 ग्राम विकास मंत्रालय दिनांक 5 एप्रिल / 202 या निर्णयानुसार कामे कशी वाटप करावी यात मार्गदर्शक तत्वे दिली आहे.
सुशिक्षीत बेरोजगार अभियंता याना 33% मजुर कामगार संस्था 33% नोंदणीकृत कंत्राटदार 34 % अशी कामे वाटप करावयास पाहिजे होती
परंतु खुल्या प्रवर्गातील निविदा प्रकाशित केल्या परंतु इतर कंत्राटदारावर अन्याय तर केलाच याबाबत चौकशी ची मागणी होत आहे.
गटविकास अधिकारी हे शासनाचे नियम परिपत्रक आदेशाला न जुमानता कामे केली जात असेल तर कंत्राटदारावर अन्याय करणारी बाब ठरत आहे
सौरउर्जा LED लाईट चे काम अशिक्षीत पूर्वठादारांना काम वाटप करून शासनाचा नियमाची पायमल्ली केली.
बाह्य . C.S.R. दर वरीष्ठांची आर्थिक मंजुरीची परवानगी न घेता मनमानी पद्धतीचे दर नोंद करून यास प्रशासकीय मंजूररात दिली आणि Meda चे सूपरीडेंट इंजिनिअर MSEB यानी तांत्रीक मंजूरात तर दिली मात्र या कामासाठी जि.प. सिविल उपअभियंता यांनी CC करून दिली या कामा मध्ये निविदा घोळ केला सदर कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची पुरवठा दराने केली कारण या तपासणीसाठी सिव्हिल अभियंता यांनी ही कामे तपासली असता त्यामुळे या कामाचे ज्ञान त्यांना नव्हतेच.
या सर्व भ्रष्ट कारभाराची व नियमबाह्य पद्धतीने दिलेल्या कामाची वरिष्ठांनी सखोल चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. (क्रमशः)

            रफिक खान                        साहसिक News-/24 यवतमाळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!