बाळापूर -/तालुक्यातील ग्रामपंचायत मोरझाडी येथील तंटामुक्त अध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया २७ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामपंचायत मोरझाडी च्या सरपंच सौ.सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यामध्ये हरिभाऊ फुकट यांची तंटामुक्ती अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली याबाबत सविस्तर वृत्त असे की,बाळापूर,तालुक्यातील ग्रामपंचायत मोरझाडी येथे तंटामुक्ती अध्यक्ष निवडीकरिता ग्रामपंचायतची २७ ऑगस्ट रोजी ग्रामसभा होती.
तर या ग्रामसभेत गावातील ग्रामस्थांनी एकमताने गावातील प्रतिष्ठित नागरिक हरिभाऊ फुकट यांची महात्मा गांधी तंटामुक्ती गाव समितीच्या अध्यक्षपदी निवड केली.तसेच स्व.गृहमंत्री आर. आर.पाटील यांच्या संकल्पनेतून पोलिसांवरील कामाचा ताण कमी तसेच गावातील किरकोळ भांडणे गावातच मिटावीत यासाठी निर्माण केल्या आहेत तसेच संबंधित ग्रामस्तरावरील ह्या समित्यांनी आज पर्यंत लहान मोठे तंटे गावातच सोडवून अनेक गावांत तंटामुक्ती झालेली आहे. तंटामुक्ती अध्यक्ष हरिभाऊ फुकट यांची निवड झाली त्याबद्दल ग्रामपंचायत कडून त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी,उपसरपंच दिलीप पाटील,नाजूकराव पाटील,सचिव,सर्व ग्रामपंचायत सदस्य.सागर शेगोकार,अनिरुद्ध सरदार प्रफुल पाटील,गोवर्धन अळाऊ, रोशन बाबुळकर,व गावकरी मंडळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.