🔥देवळी तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा नागपूर येथे सत्कार.
देवळी -/तालुक्याचा मान वाढवत चार गुणवंत विद्यार्थी आणि दोन पत्रकारांचा नागपूर येथे भोई गौरव मासिक यांच्या वतीने आयोजित भव्य सत्कार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पद्मश्री माजी राज्यसभा सदस्य डॉ. विकास महात्मे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रमोद काळबांडे, प्रा. महेंद्र खेडकर (संस्थापक संचालक अ. भा.भो. स. कल्याणकारी मंच), गोपाळ धारपवार (मुख्य निरिक्षक, कल्याणकारी मंच कोषाध्यक्ष विभाग), डॉ. प्रा. श्रीकृष्णा ढाले, बालू गो. कावनपुरे (उप-अभियंता, मुंबई) व प्रविण दिघोरे, प्रकाश लोणारे, चंद्रकांत लोणारे यांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमात भोई गौरव हिरकणी पुरस्कार देवळीचे सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक रविंद्र पारीसे यांना बहाल करण्यात आला. उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार पत्रकार गणेश शेंडे यांना प्रदान करण्यात आला.विद्यार्थी विभागात, चित्रकला, काव्यलेखन व लेखन क्षेत्रातील विशेष कामगिरीबरोबरच राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रातून पाचवा क्रमांक मिळवणारी वंशिका पारीसे हिचा गौरव झाला. दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवणारी कोमल प्रमोद पचारे, बारावी परीक्षेत उत्तम गुण मिळवणारी वैष्णवी किसना पारीसे व खुशबू विष्णू करलुके यांचा सन्मान करण्यात आला.मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच कला, क्रीडा व साहित्य क्षेत्रातही पुढे जाण्याचे प्रेरणादायी मार्गदर्शन केले, तर पत्रकारांनी वस्तुनिष्ठ व जबाबदार वृत्तांकनाद्वारे समाजहित साधावे, असे आवाहन केले. प्रास्ताविक मथूरा सुरजूसे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल गौर, राजाराम म्हात्रे, आभार माधुरी आमझरे यांनी मानले. यावेळी पवन पारीसे, प्रमोद पचारे, किसना पारीसे, पुष्पा करलुके, पालक, मान्यवर व स्थानिक नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती.