देवळी येथे प्रजापिता ब्रह्मकुमारी सेंटर दिव्य दर्पण भवन उद्घाटन समारोह संपन्न
प्रतिनिधी / देवळी ;
देवळी शहरातील लक्ष्मीनारायण नगर येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय सेंटर बांधकामाचे काम पूर्ण होऊन दिव्य दर्पण भवन उद्घाटन समारोहचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी कार्यक्रमाची सुरुवात फित कापून झेंडावंदन करून व दीप प्रज्वलन करून सुस्वागतम या गीतावरील नुत्य सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटन राजयोगी ब्र. कु. सुरज तर आशिर्वचन राजयोगिनी ब्रह्मकुमारी रजनी दीदी तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार रामदास तडस, सुचीता मडावी नगराध्यक्ष देवळी, नरेंद्र मदनकर देवळी नगर उपाध्यक्ष,मोहन अग्रवाल ज्येष्ठ समाजसेवक देवळी, मिलिंद भेंडे माझी जी.प सभापती,ब्रह्मकुमारी माधुरी दीदी सेवा केंद्र संचालिका वर्धा,ब्रह्मकुमारी ममता बहन सेवा केंद्र संचालिका ब्रह्मकुमारी परिवार देवळी याप्रसंगी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेंटर दिव्य दर्पण याचे उद्घाटन राज योगी ब्र. कु. सुरज माउंट आबू राजस्थान यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी खा.रामदास तडस यांनी सांगितले की प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय सेंटर या ठिकाणी जे लोक येतात ते सर्व देवाला मानतात त्याच प्रमाणे कोरोना काळामध्ये सुद्धा या संस्थेने खूप लोकांना मदत केली.तसेच या देवळी शहरात प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय बांधकाम पूर्ण होऊन आज त्याचा शुभारंभ आहे. व या ठिकाणी काही अर्धवट कामे राहिलेले आहेत तर ते कामे येणाऱ्या जानेवारी ते फरवरी महिन्यापर्यंत नगर परिषद च्या माध्यमातून पूर्ण होईल असे आश्वासन दिले.तसेच प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्व विद्यालय सेंटर देवळी यांच्या वतीने आभार व्यक्त करून प्रजापिता ब्रह्मकुमारी सेंटर दिव्य दर्पण भवन उद्घाटन समारोह पार पडला.