🔥नारायण जारुंडे यांना राज्यस्तरीय प्रबोधिनी स्टार पुरस्कार.
देवळी -/ वर्धा जिल्ह्यातील देवळीतालुक्यातील पाथरी गावाचे नारायण ऋषीजी जारुडे यांचे उल्लेखनीय व विविध क्षेत्रात योगदाना बद्दल सन्मानचिन्ह, देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. दिनांक 1 मार्च 2026 ला चंद्रपूरच्या प्रबोधिनी न्यूज आणि प्रबोधिनी मंच चंद्रपूर महाराष्ट्र साहित्य समूह चंद्रपूर च्या वतीने आयोजित हा कार्यक्रम 2 सत्रात चालणार असून ह्या कार्यक्रमाला नामवंत कवी, मंत्री, खासदार, आमदार, सामाजिक कार्यकर्ते, व इतर मान्यवर उपस्थित राहणार असून हा कार्यक्रम दुसऱ्या सत्रामध्ये होणार या अगोदर जारुंडे यांना दिल्ली, नागपूर, वर्धा, कारंजा येथे वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.