सेलू -/नारी ही जग जगत ज्यांनी आहे तिच्या खांद्यावर मुलांना संस्कृत संस्कृत करण्याची मोठी जबाबदारी आहे.नारी कुटुंबाचाच नव्हे तर संपूर्ण समाजाला एका प्रेमाच्या सूत्रामध्ये बांधते. ” नारी नरकाचा नव्हे तर स्वर्गाचा दरवाजा खोलणारी आहे” ती लक्ष्मी, दुर्गा सरस्वतीचा ,अवतार आहे. असे प्रेरणादायी व्याख्यान ब्रह्मकुमारी स्पर्धा सेवा केंद्रच्या संचालिका माधुरी दीक्षित यांनी महिलांना प्रति दिले. कोटंबा येथील सरपंच रेणुका कोटंबकार या आपले भाव व्यक्त करताना म्हणाल्या की ब्रह्माकुमारीज् मै द्वारे संचालित खूप मोठी संस्था आहे, जी समाजासाठी आपल्या उत्कृष्ट सेवा देत आहे व समाजापुढे उदाहरण आहे की महिला काय करू शकतात. पुढे त्या म्हणाल्या “महिलांनी आपल्या सुप्त गुणांची जाण करून त्याला वाढवावे ही काळाची गरज आहे”. माहेर शांती निवास सेलू येथील समाज सेविका मायाताई शेळके या आपले अनुभव व्यक्त करताना म्हणाल्या आपण कधी घरगुती गोष्टींना सहन करावे व कधी सामावून घ्यावे ही शिकवण ब्रह्माकुमारीच येथे दिली जाते. सोबतच मेडिटेशन शिकल्याने आपल्या जीवनामध्ये संयम व स्थिरता येते. डॉक्टर दिलीप निमजे यांच्या धर्म पत्नी सौ छायाताई निमजे यांनी एका सुंदर कवितेद्वारे आपले मनोगत व्यक्त केले व उपस्थित महिलांना शुभेच्छा दिल्या.
ब्रह्माकुमारी स्वागत केवळ सेतू येथे दिनांक 10 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला, याप्रसंगी विभिन्न मार्गदर्शन खेळे आयोजित करण्यात आले. सर्वप्रथम ब्रह्माकुमारी सेलूच्या संचालिका दर्शना दीदी यांनी पाहुण्यांचे पुष्पांनी व शब्दसमनाने स्वागत केले व महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. H मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी दिदी यांनी केले. कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या प्रमाणात उत्कृष्ट प्रतिसाद दिला.