परसोडा येथील अर्धवट सिमेंट रस्त्याचे बांधकाम सोडून कंत्राटदार बेपत्ता…

0

🔥परसोडा येथील अर्धवट सिमेंट रस्त्याचे बांधकाम सोडून कंत्राटदार बेपत्ता.

🔥अपघाताची मालिका सुरूच, आतापर्यंत दहा जण जखमी.

आष्टी शहीद -/ आष्टी तालुक्यातील परसोडा गावात सिमेंट रस्त्याचे बांधकाम अर्द्यावर सोडून काम करणारा कंत्राटदार बेपत्ता झाला आहे. अर्धवट कामामुळे आतापर्यंत सहा दुचाकी स्वार पडून गंभीर जखमी झाले आहेत. दुचाकी घसरून पडण्याची मालिका सतत सुरु असल्यामुळे गावात सार्वजनिक बांधकाम विभाग प्रति नागरिकांत रोष निर्माण झाला आहे.
आष्टी पासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या परसोडा गावाच्या मधात सिमेंट रस्त्याचे काम सुरु आहे. सिमेंट रस्त्याच्या कामात लोखंड शोधून दिसत नसल्याने निकुस्ट दर्जाचे काम सुरु आहे.सिमेंट रस्त्याचे काम करण्यापूर्वी दोन्हीही बाजूने सांडपाणी वाहून जाणाऱ्या नाल्या निर्माण करणे गरजेचे होते परंतु नाल्या न करता सिमेंट रस्ता बांधकाम सुरु आहे. रस्त्यावर गिट्टीचे ढीगरे टाकण्यात आले असून ती गिट्टी रस्त्यावर पसरून दुचाकी चे अपघात होत आहे. होणाऱ्या अपघाताचा प्रसंग गावकर्यांनी कॅमेऱ्यात कैद केला आहे. सरपंच छत्रपती रावळकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी पठाण व नासरे यांच्या कडे फोनवरून चौकशी केली तेव्हा मंजूर अंदाज पत्रकात सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या नाहीत असे सांगितले. नाल्या बांधकाम होणार नाही हे गावकर्यांना समजल्यावर गावकरी आश्चर्य व्यक्त करीत आहे. सिमेंट रस्ता निर्माण झाल्यावर गावातील सांडपाणी रस्त्यावर वाहणार असे चित्र आहे. गावकरी आक्रमक झाले असून आता आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहे. गावात सुरु असलेल्या कामाचा अंदाज कंत्राटदाराणा लागला असावं म्हणून त्याने अर्धवट काम सोडून पोबारा केला असा गावकर्यांचा आरोप आहे.

            नरेश भार्गव                        साहसिक News-/24 आष्टी,शहीद 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!