फकीरवाडी वार्डातील रस्त्याची व नाल्याची समस्या घेऊन तहसील कार्यालयात अतूल वांदीलेंचा ठिय्या…

0

🔥जाम येथील फकीरवाडी परिसरातील महिलांसह चिमुकल्यांचा देखिल आंदोलनात सहभाग.🔥समुद्रपूर तहसील कार्यालयातील ठिय्या आंदोलन तहसीलदारांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे.     

🔥राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी दोन तास केलें ठिय्या आंदोलन.

🔥तहसीलदार यांनी कंत्राटदार यांना तात्काळ रस्ता दुरूस्तीचे दिले आदेश.

🔥जाम येथील फकीरवाडी वार्डातील चिमुकल्यांचा हस्ते तहसीलदारांना दिले निवेदन.

समुद्रपूर-/ जाम येथील फकीरवाडी वार्डातील रस्त्याची व नाल्याची समस्याबाबत तहसील कार्यालयात राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी दोन तास ठिय्या आंदोलन केलें. तहसीलदार यांनी कंत्राटदार यांना तात्काळ रस्ता दुरूस्तीचे आदेश दिल्या नंतर आंदोलन मागें घेण्यात आले.यावेळी जाम येथील फकीरवाडी वार्डातील त्रस्त पुरुष महिला आपल्या चिमुकल्या मुलांना घेऊन आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
जाम येथील फकीरवाडी वार्डातील नागरिकांना सतत रस्त्याच्या व पाण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते आहे. गावात शिरताच रस्ता दिसेनासा होतो. या गावात थोडासा जरी पाऊस आला कि नागरिकांच्या घराआत पाणी शिरतो व रस्ता पूर्ण पने बंद होतो. साचलेल्या पाण्याने व वाढेलेल्या घाणीचे गावातील नागरीक आजारी पडते आहे, अश्या वेळेस त्या आजारी नागरिकास रूग्णालयात नेने देखिल यां असल्या रस्त्याने शक्य होत नाही यामुळें यां परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. रस्तातर नाहीच मात्र नावाला आसलेल्या रस्त्याच्या कडेला नाली देखील नाही. यामुळें हा रस्ता रस्ता नसून सांडपाणी वाहणारा नाला दिसुन येतो. यामुळे या गावात पसरलेल्या अस्वच्छतेने व दूषित पाण्याने मोठी रोगराई वाढत आहे.. सध्या डेंगूजन्य परिस्थिती सर्वत्र निर्माण झाली असून डेंगूचे डास निर्माण करणारी फॅक्टरी जणू हा रोड बनला असल्याचे या रोड मध्ये साचलेल्या सांड पाण्याने दिसून येते आहे.. अतिशय बिकट परिस्थिती झालेल्या या गावातील नागरिकांची समस्या सोडवण्यासाठी म्हणून आज राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी चक्क तहसीलदार यांच्या केबिनमध्ये ठिय्या करून आंदोलनच केले. तहसीलदारांनी देखील लगेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवून ताबडतोब रस्त्याची करून रस्ता आता चालल्या योग्य करून देण्याबाबत हमी दिली तसेच पुढील दोन-तीन दिवसांमध्ये या रस्त्याबाबत व नालीबाबत मीटिंग बोलवित यावर मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.. यादरम्यान गावातील चिमुकल्या बालकांद्वारे तहसीलदारांना आपल्या तक्रारीचे निवेदन देण्यात आले. गावातील रस्ता ९५/५ अंतर्गत मंजूर झाला असून प्रस्ताव पास झाला; पण रस्ता अद्याप तयार झालेला नाही.
याकरिता राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी फकिरवाडी गावातील नागरिकांना घेऊन तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते व यां आंदोलना मुळे तहसीलदार यांनी तात्काळ यांची दखल घेऊन कंत्राटंदार यांना रस्ता बनविण्याकरीता आदेश दिले..
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्यासह तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अशोक वांदिले,विधानसभा बूथ प्रमुख अमोल बोरकर, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे,जिल्हा सरचिटणीस सुभाष चौधरी, तालुका उपाध्यक्ष मंगेश गिरडे, जिल्हा सरचिटणीस गजानन शेंडे, युवक तालुका अध्यक्ष तुषार थुटे, महादेव वांदिले, रोशन थुटे,उपसरपंच अभिजीत गिरडकर, मंगेश पाटील, प्रमोद कुडमेथे, दत्ता भिवनकर यांच्यासह फकिरवाडी वॉर्डातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्युरो रिपोर्ट साहसिक news-24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!