🔥वर्षातून दोन ते तीन वेळा थिंगळे जोडणीते सतत उखडतच राहते.
🔥ब-याच वर्षांपासून या रस्त्यावर डांबरच ओतले नाही विद्यार्थी ,शेतकरी ,वाहनधारक त्रस्त.
भिडी-देवळी -/तालूक्यातील बाभूळगाव (खोसे)ते काजळसरा या रस्त्याची दयनिय अवस्था झाली असून या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे डोळे झाकले की काय ?असा प्रश्न येथे उपस्थित होतो या रस्त्याचे वर्षातून दोन ते तीन वेळा थिंगळे जोडणी केल्या जाते व ते एक महीण्यातच उखडूण दगड रस्त्यावर विखूरले जाते पन त्यावर डांबर मात्र टाकले जात नाही हा रस्ता फंक्त थिगळ जोडनीवरच आहे असे ग्रामस्थ सांगत आहे
भिडी -रत्नापूर -वाबगाव या चौरस्त्या पासून बाभूळगाव( खोसे) कडे जाणारा व बाभूळगावातून काजळसरा पर्यंत या रस्त्यांनी पाळदळ चालने कठीण झाले आहे या रस्त्याचे दर वर्षाला दोन ते तिन वेळा थिंगळे जोडली जातात तर हिच थिगळे महीण्यातच उखडूण जात असल्याने दगड रस्त्यावर विखूरले जाते आहे सालाबाद प्रमाणे थिगळे जोडणी करून या मार्गावर डांबरिकरन मात्र का ? करण्यात येत नाही हे मात्र एक कोडेच आहे.बाभूळगाव येथिल शालेय विद्यार्थ्यांना भिडी,देवळी येथे शिक्षणाकरीता दररोज जावे लागतात या रस्त्यावर सर्वत्र विखूरलेली गिट्टी पसरल्याने सायकल ,दूचाकी कसी चालवायची असा गंभिर प्रश्न पडला आहे तर रात्रिला काळोख अंधारात विखूरलेल्या थिगळाचे खोलवर खड्डे ,व विखूरलेल्या गिट्टी मूळे विद्यार्थ्यांना अपघातास मूकावे लागत आहे
या रस्त्याकडे त्वरीत सार्वजनिक बांधकाम विभागानी डोळे उघडावे असी मागणी नागरीक करत आहे -+
{ शरदराव देशकर माजी प.स.सदस्य
या चौरस्त्यापासून तर काजळसरा पर्यंत पायदळ चालणे कठीण झाले आहे हा रस्त्याचे सालाबाद थिगळेच जोडली जातात पन त्यावर डांबरांची चादर ओढली जातच नाही त्यामूळे जोडलेली थिगळे उखडली जात आहे याचा नाहक त्रास गावातील विद्यार्थ्यांना,शेतक-यांना, वाहनचालकांना व रोज मंजूराना सोसावा लागत आहे }
{ जिवण ढोक प्रगतीशिल शेतकरी बाभूळगाव खोसे चौरस्त्यापासून तर काजळसरा पर्यंत या रस्त्यांची दर वर्षाला डागडूगिच केल्या जाते आम्हा शेतक-यांना शेतात जातांनी नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यातही या रस्त्यावर गूरे कसे न्यावे त्यांच्या पायांना विखूरलेल्या गिट्टी मूळे जखमा होत आहे या रस्त्याचे काम त्वरीत न झाल्यास आम्हा गावक-यांना जन आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल.