बीड़कीन -/पोलीस स्टेशन अंतर्गत असलेले जिल्हा परिषद शाळा व संस्था व इंग्लिश हायस्कूलचे मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांची बिडकीन पोलीस स्टेशन येथे मीटिंग घेण्यात आली मीटिंगमध्ये पीआय प्रमोद पाटील सर यांनी सर्व मुख्याध्यापक केंद्रप्रमुख शालेय समिती अध्यक्ष यांना सुचित केले की जर आपल्या शाळेमध्ये विना ओळखी व्यक्ती जर आत येत असेल तर त्याची चौकशी करा दारू पिणारे शाळेमध्ये येऊन त्रास देत असेल तर त्वरित बिडकीन पोलीस स्टेशनसी संपर्क करा व शाळांमध्ये एक टपाल बॉक्स बसवण्यात येईल त्या बॉक्समध्ये जर आपल्याला कोणत्याही व्यक्तीशी अडचण असेल तर त्या बॉक्समध्ये माहिती लिहून टाकावी दररोज त्या बॉक्सची तपासणी होईल व कोणीही अनोळखी व्यक्ती शाळेत जर दिसत असेल तर तात्काळ आपल्याकडे पोलीस स्टेशनचे नंबर असेल कोणत्याही नंबर वर तत्काळ कळवा त्यामध्ये आमची टीम स्पॉटवर तृतीयेईल व तातडीने कारवाई करेल व काही घटना घडण्याचा उपक्रम होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी व प्रत्येक शाळेने सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध करून लवकरात लवकर लावण्यात यावे असी सूचना सुद्धा पीआय प्रमोद पाटील सर यांच्यामार्फत देण्यात आली.