बुलढाण्यात विद्यार्थ्यावर अमानुष मारहाण; शाळा अध्यक्षाच्या मुलावर गंभीर आरोप..

0

🔥बुलढाण्यात विद्यार्थ्यावर अमानुष मारहाण; शाळा अध्यक्षाच्या मुलावर गंभीर आरोप.

🔥“तक्रार केली तर जिवे मारू” — धमकीने पालक संतप्त, कठोर कारवाईची मागणी.

🔥माउंट सिनाई स्कूल प्रकरणाने खळबळ; पोलिसांकडे धाव, उलट तक्रारीमुळे संशय वाढला.

 बुलडाणा -/ बुलढाणा येथील माउंट सिनाई इंग्लिश स्कूलमध्ये एका विद्यार्थ्याला कॉपीच्या संशयावरून बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मारहाणीमागे शाळा अध्यक्षाच्या मुलाचा सहभाग असल्याचा आरोप पालकांनी केला असून, विद्यार्थ्याला शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे सांगितले जात आहे.घटनेनंतर संतप्त पालकांनी संबंधिताला जाब विचारला असता “तक्रार केली तर जिवे मारू” अशी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी रायपूर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे. दरम्यान, आरोपीकडून उलट पालकांविरोधात तक्रार दाखल केल्याने प्रकरण अधिकच गूढ बनले असून कठोर कारवाईची जोरदार मागणी होत आहे.

         ब्युरो रिपोर्ट साहसिक      News-/24 बुलढाणा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!