बोहल्यावर चढण्याआधीच नवरदेवांनी बजावला मतदानाचा हक्क!..

0

🔥आधी लग्न लोकशाहीचे.🔥नवरदेवाने दिला लोकशाही याचा प्रत्यय.

सिंदी (रेल्वे) / लग्न म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील आनंदाचा महत्वाचा क्षण. पण, त्याहून महत्वाचं असतं ते आपल्या राष्ट्राप्रती, आपल्या देशाप्रती असलेलं कर्तव्य. हेच लक्षात ठेवत सिंदी येथील वडांद्रे परिवारातील नवरदेव शुभम रामकुमार वडांद्रे व आमगाव (खडकी) येथील बंटी पंदराम या दोन्ही नवरदेवाने बोहल्यावर चढण्याआधी मतदानाचा हक्क बजावला.
लोकशाहीचा लोकोत्सव सर्वत्र साजरा होत असताना शुक्रवारी स्वतःच्या लग्नापूर्वी मतदानाचा हक्क बजावून सिंदी (रेल्वे) येथील शुभम रामकुमार वडांद्रे व सेलू तालुक्यातील आमगाव (खडकी) येथील बंटी पंदराम या दोन्ही नवरदेवांनी आधी लग्न लोकशाहीचे याचा प्रत्यय देत मतदानाचा हक्क बजावला. शतप्रतिशत मतदानासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. राजकीय पुढारी आणि कार्यकर्ते देखील यासाठी प्रयत्नशील आहेत. यावेळी नवरदेवांच्या कुटुंबीयांनी व त्यांच्या मित्रांनी लग्नाला निघण्यापूर्वी त्यांची कार आमगाव परिसरातील मतदान केंद्रावर आणून नवरदेवाला मतदानासाठी नेले. यावेळी प्रशासनाकडूनही नवरदेव शुभम वडांद्रे व बंटी पंदराम यांचे कौतुक करण्यात आले. यासोबतच जिल्ह्यात बहुतांच्या ठिकाणी नवरदेवाने व नवरीने लग्नाला जाण्यापूर्वी तसेच सोबत मतदानाचा हक्क बजावल्याची माहिती समोर येत आहे.
देशभरासह आज महाराष्ट्रातही लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली असून विदर्भात आज मतदान होत आहे. सकाळपासूनच तरूण, म्हातारे-कोतारे, मध्यमवयीन नागरिक, मतदानासाठी सर्वजण उत्साहाने बाहेर पडले आहेत. एवढंच नव्हे तर दिव्यांग नागरिकही त्यांचं मतदानाचं कर्तव्य बजवाताना दिसत आहेत.

दिनेश घोडमारे साहसिक न्यूज /24 सिंदी रेल्वे 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!