ब्रेकिंग न्यूज: हिंगणा नगर पंचायतची मोठी निष्काळजीपणा उघड! नंबर प्लेटशिवाय वाहनं रस्त्यावर धावत.

0

🔥ब्रेकिंग न्यूज: हिंगणा नगर पंचायतची मोठी निष्काळजीपणा उघड! नंबर प्लेटशिवाय वाहनं रस्त्यावर धावत.

हिंगणा -/ नगर पंचायत हिंगणा कार्यालयातील अग्निशामक दलाचे वाहन तसेच दोन ट्रॅक्टर गेल्या अनेक वर्षांपासून नंबर प्लेटशिवाय रस्त्यावर धावत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नियम सर्वसामान्यांसाठी कडक असताना, सरकारी वाहनांनाच नियमांचे उल्लंघन करण्याची मुभा दिली जाते का ? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

याप्रकरणी नगर पंचायतमधील एका कर्मचाऱ्याने पेटीतून नंबर प्लेट काढून दाखवली, मात्र एवढ्या वर्षांपासून ती वाहनांवर का लावण्यात आली नाही, याचे समाधानकारक उत्तर मिळाले नाही. या गंभीर निष्काळजी पणाबाबत मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी चौकशी करून तात्काळ माहिती देण्याचे आश्वासन दिले आहे.

आता मोठा प्रश्न असा की, नियम मोडणाऱ्या या सरकारी वाहनांवर कारवाई कोण करणार ? की हे प्रकरणही दडपून टाकले जाणार ?(क्रमशः)

गजानन ढाकुलकर साहसिक News-/24 हिंगणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!