भद्रावतीच्या तहसीलदारांना 25 हजारांची लाच घेताना एसीबीने केली अटक : नागपुर एसीबीची कारवाई

0

 

प्रतिनिधी / चंद्रपूर

पकडलेले रेतीचे वाहन सोडविण्यासाठी पंचवीस हजार रुपयाची लाच स्वीकारताना चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीचे तहसीलदार यांना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात अटक केल्याने महसूल प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे . ही कारवाई आज शनिवारी 11 डिसेंबर ला नागपूर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी केली आहे .
डॉ. नीलेश खटके असे तहसीलदाराचे नाव आहे . भद्रावतीचे तहसीलदार डॉ . नीलेश खटके विविध प्रकरणात वादग्रस्त ठरले होते . भद्रावती तालुक्यात सुरू असलेल्या अवैद्य रेती व्यवसायाकडून हप्ता वसुली करीत असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे . भद्रावतीमधील रेती व्यवसायिक वासूदेव ठाकरे यांचे वाहन पकडल्यानंतर त्यांच्या कडून आज शनिवारी तहसीलदार यांनी सोडून देण्यासाठी लाजेची मागणी केली होती . सदर व्यवसायिकाने नागपूर येथे एसीबीकडे याबाबत तक्रार केली होती . या तक्रारीच्या आधारे सापळा रचण्यात आला होता . त्यात महसुल प्रशासनाचे बड़े अधिकारी म्हणजे भद्रावतीचे तहसीलदार यांना 25 हजाराची लाच घेताना अटक करण्यात आली आहे . या घटनेने महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!