🔥मगणवाडी एमगीरी येथील आरोग्य विषयक प्रशिक्षण वैद्यकीय कार्यशाळा मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडली.
वर्धा -/ रविवार दि.०४ जानेवारी २०२६ रोजी माँ चंडीकादेवी आयुर्वेद योग निसर्गोपचार संस्था मोरांगणा, वर्धा अंतर्गत, माँ चंडीकादेवी ईन्स्टिट्युट ऑफ एक्युपंचर सायन्स मोरांगणा वर्धा येथे महाराष्ट्र एक्युपंचर कौन्सिल मुंबई यांचे मार्गदर्शक तत्वानुसार एक दिवसीय सी.ए.ई आरोग्य विषयक प्रशिक्षण कार्यशाळा वर्धा शहरातील मगनवाडी एमगीरी येथील निसर्गरम्य परिसरात, मोठ्या उत्साहात व आनंदात पार पाडली. ह्या सी.ए.ई कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा सामान्य रूग्नालयाचे प्रभारी, जिल्हा शल्यचिकीत्सक मा. श्री डॉ गाठे साहेब, तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी मा. श्री डॉ. स्वप्नीलजी बेले साहेब, मा. श्री सुरेशजी पट्टेवार, जेष्ठ समाज सेवक व वर्धा जिल्हा शिवा संघटनेचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री राजुजी राठीजी सामाजीक कार्यकर्ते, मोरांगणा त्याचप्रमाणे माँ चंडीकादेवी आयुर्वेद योग निसर्गोउचार संस्था मोरांगणा येथील संस्थेचे प्राचार्य मा. जी. बी. देशमुख तसेच कार्यक्रमाच्या आयोजीका सौ. माधुरीताई देशमुख प्रामुख्याने हजर होते. महाराष्ट्र एक्युपंचर कौन्सिल मुंबई येथील शासन मान्यताप्राप्त स्पिकर मा.श्री पटेकर सर, मा. श्री बोबडे सर, व मा. सुवर्णाताई वाणी ह्यांनी सी.ए.ई. कार्यशाळेला उत्तम प्रकारे प्रॅक्टीकल सह प्रशिक्षण दिले. ह्या माँ चंडीकादेवी ईन्स्टिट्युट ऑफ एक्युपंचर सायन्स मोरांगणा च्या सी.ए.ई प्रशिक्षणाकरीता संपुर्ण महाराष्ट्रातुन भरपुर मोठ्या प्रमाणात एक्युपंचारीष्ट आले होते. संस्थेचे प्राचार्य श्री जी. बी. देशमुख यांनी आपल्या भाषनात प्रशिक्षणार्थ्यांना संबोधीत केले की सदरच्या संस्थेचा सी.ए.ई घेण्याचा मुख्य उद्देश म्हणजे महाराष्ट्रातील एक्युपंचारीष्ट बांधवाच्या ज्ञानात अधिकाधीक भर पडावी व ही उपचार पध्दती शहरापलीकडच्या अतीदुर्गम डोगंराळ भागातील शेवटच्या घटका पर्यंत पोहचवुन या उपचार पध्दतीचा जास्तीत जास्त प्रसार प्रचार व्हावा हा खराखुरा उद्देश होय. संस्थेच्या चेअरमन सौ. माधुरीताई देशमुख यांनी आपल्या भाषनात असे मत वर्तवीलेकी ह्या महाराष्ट्र कौन्सिल मान्यता प्राप्त विनाऔषधी उपचार पध्दतीचे, विनामुल्य शिबीर घेवुन गोरगरीब जनते पर्यंत ही उपचार पध्दती पोहचावी, आज ही काळाची गरज आहे, असे आपल्या भाषनात प्रशिक्षणार्थ्यांना संबोधीत केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन मा.श्री रामानंदजी जिवतोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन मा.श्री राजेशजी शेंद्रे यांनी केले. ह्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता मा. श्री सुबोधकुमारजी मा.श्री भुते साहेब, पायल देशमुख मॅडम, तसेच कॉलेजचे अधिकारी वर्ग व कॉलेचे प्रशिक्षनाथ्यर्थी आणि आजी माजी टीमने खुप मोलाचे सहकार्य केले.