🔥सुमित वानखेडेंचा ‘लाडक्या बहिणींशी’ संवाद.🔥मोई – मुबारकपूर येथे ‘लाडक्या बहिणींचा देवाभाऊ’ कार्यक्रम संपन्न.
आष्टी -/ तालुक्यातील मोई मुबारकपूर येथे ‘लाडक्या बहिणींचा देवाभाऊ’ कार्यक्रमात महिलांसाठी महायुती सरकारच्या असलेल्या योजनांचा प्रचार व प्रसार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला सुमित वानखेडे हे अध्यक्षस्थानी लाभले होते. या कार्यक्रमात बंजारा संस्कृती नुसार पारंपरिक पद्धतीने सुमित वानखेडे यांचे स्वागत केले गेले. बंजारा युवतींनी सुंदर व कलात्मक बंजारा नृत्य सादर केले.कार्यक्रमाला उपस्थित महिला व मान्यवरांना संबोधित करताना सुमित वानखेडे यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे महायुतीचे सरकार महिलांच्या विकासासाठी आवश्यक योजना राबवून महिला सबलीकरणासाठी काम करत आहेत. आर्वी मतदारसंघातील सर्व समाजघटकातील महिलांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी गावोगावी कॅम्प आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील भगिनींना रक्षाबंधनाच्या पावन पर्वावर ‘माझी लाडकी बहीण’ योजना आणुन महाराष्ट्रातल्या बहिणींना थेट लाभ मिळवून दिला. ‘माझी लाडकी बहीण’ हि योजना आपले सरकार असे पर्यंत बंद पडणार नाही अशी ग्वाही दिली.कार्यक्रमाला उपस्थित लाडक्या बहिणींनी उस्फूर्तपणे पुढे येऊन मनोगत व्यक्त करत देवाभाऊंचे आभार मानत भक्कमपणे भाजपाच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला. या कार्यक्रमाला जिल्हा महामंत्री अशोक विजयकर, तालुका अध्यक्ष कमलाकर निंभोरकर, जिल्हा उपाध्यक्ष सचिन होले, तालुका महामंत्री प्रशांत काकपुरे, ॲड. मनिष ठोंबरे, मधुकरराव राठोड, किसनसिंग चव्हाण, चंद्रशेखर शेळकी यांची प्रमुख उपस्थिती होती.