🔥मातेच्या मंदिरात महिला मंडळ कडून महिला मंडळा कडून गुढीची उभारणी.
येळाकेळी -/ येथे दुर्गामातेच्या मंदिरामध्ये महिला मंडळात कडून गुढीपाडवा या सणा निमित्त सकाळी पूजाअर्चना करून भक्तिमय वातावरणात गुडीची उभारणार करण्यात आली. येथील मातेच्या मंदिरामध्ये श्रद्धाळू भाविक भक्तांची गर्दी दिसून आली.गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील सर्वांत महत्त्वाचा सण आहे .तो मराठी नववर्षाचे स्वागत करणारा सण असून चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो. निसर्गातील नवे चैतन्य, आनंद, आणि नवी सुरुवात या सणाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमांमध्ये सरला चापडे, सरला भांडेकर, भारती चलाख, अनिता सायरे ,प्रांजली बारसागडे, प्रभा धोंगडे, उमा डहाके, शितल गडकर, आरती गव्हाळे, वैशाली डोंबरे, सविता चिचघरे, सविता भांडेकर, मीना डोंबरे, योगिता भांडेकर, मीनाक्षी खोबे, योगिता लटारे,वैशाली शेंडे ,उषा सोमनकर यांनी सहकार्य केले.