मैथिली नगरात मायलेकींचा देह विक्री व्यवसाय जोमात पोलिसांप्रती नागरिकांनी मध्ये तीव्र नाराजी

0

🔥मैथिली नगरात मायलेकींचा देह विक्री व्यवसाय जोमात.

🔥पोलिसांप्रती नागरिकांनी मध्ये तीव्र नाराजी,दलाल.तिरुबाई मानवर
पोलीस टेंशन हद्द.लोहारा पोलीस टेंशन

यवतमाळ -/ पोलिसांनी यापूर्वी अनेक हाय प्रोफाईल देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.यवतमाळ शहरातील अनेक उच्चभ्रू वस्तीमध्ये हा देहविक्रीचा व्यवसाय अद्यापही सुरूच असून शहरातील लोहारा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मैथिलीनगर परिसरात सर्रास देहविक्री केल्या जात असल्याची विश्वसनीय माहिती पुढे आली आहे.याकडे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष देऊन परिसरातील नागरिकांना यातून मुक्तता करावी अशी मागणी नागरिकांकडून केल्या जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मैथिली नगर परिसरातील एका गुंड प्रवृत्तीच्या मुलीचा आधार घेऊन घरातच देहविक्रीचा व्यवसाय सुरु आहे. या ठिकाणी आंबट शौकीन ग्राहकांकडून 3 ते 4 हजार रुपये घेत या महिला देहविक्रीचा व्यवसाय चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. व्हॉट्सअॅपवर तरुणींचे फोटो पाठवून सौदे ठरायचे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हाय प्रोफाईल देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश करून नागरिकांना होणाऱ्या त्रासातून मुक्तता करावी अशी मागणी सतत केल्या जात आहे.मात्र याकडे पोलीस गांभीर्याने लक्ष देत नसल्याची तक्रार सुद्धा नागरिकाकडून केल्या जात आहे. या ठिकाणी
काही गरजू महिलांसह तरुणींना पैशांचं आमिष दाखवत या ठिकाणी देहविक्रीचा धंदा चालवला जात आहे. या महिलांना पैशाचे आमिष दाखवून या व्यवसायात ढकलण्यात आले होते.उच्चभ्रू वस्तीतील देहविक्रीचा व्यवसाय सुरु असल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.(क्रमशः)

        ब्युरो रिपोर्ट साहसिक      News-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!