यवतमाळ पोलिसा,ची शेतकरी बांधवा सोबत हुज्जत बाजी! बघा व्हिडिओ लिंक सविस्तर….

0

🔥हीच त्या यवतमाळ पोलिसा’ची शेतकरी बांधवा सोबत हुज्जत बाजी.

 यवतमाळ -/ शहरातील चिंतामणी मार्केट परिसरात शेतकऱ्यांवर अन्यायकारक कारवाई सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. बाजारपेठेत शेतीमाल विक्रीसाठी आलेल्या एका शेतकऱ्याची गाडी ओव्हरलोड असल्याचे कारण देत पोलिस अधिकाऱ्यांनी गाडी अडवली व चलन भरण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला.
या कारवाईदरम्यान संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी अत्यंत चुकीच्या व अपमानास्पद शब्दांत संवाद साधला, असा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. कष्टकरी शेतकरी आपला माल विकण्यासाठी बाजारात येतो, तेव्हा त्याच्यावर अशा प्रकारे वागणूक देणे हे अत्यंत निषेधार्ह आहे.
शेतकरी आधीच नैसर्गिक आपत्ती, उत्पादन खर्च, कमी बाजारभाव यामुळे अडचणीत असताना, बाजार परिसरातच पोलिसांकडून होणारा हा मानसिक छळ व अन्याय सहन केला जाणार नाही.
या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, तसेच भविष्यात बाजार परिसरात शेतकऱ्यांशी सन्मानपूर्वक वागणूक देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घ्यावी व शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 यवतमाळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!