आष्टी (शहीद) -/ येथील क्रांती ज्ञानपीठ शाळा मध्ये शालेय अभ्यासक्रमासोबतच अबॅकस, वैदिकमॅथ,हॅन्ड रायटिंग ,कॅलिग्राफी सारखे अतिरिक्त अभ्यासक्रम समाविष्ट करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याहेतूने शाळेमध्ये इत्यादी कोर्स विद्यार्थ्यांसाठी चालू केले आहे. सन २०२४-२५ मध्ये इंटरनॅशनल अबॅकस कॉम्पिटिशन स्पर्धा परीक्षेमध्ये एकूण ३२ विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांची ही स्पर्धा परीक्षा ऑनलाइन पद्धतीने
घेण्यात आली.या स्पर्धा परीक्षेत चि. परीक्षित विजय खरडे या विद्यार्थ्याने अवघ्या दहा मिनिटांमध्ये शंभर उदाहरणांची अचुक उत्तरे काढून १०० पैकी १०० गुण प्राप्त करून इंटरनॅशनल अबॅकस स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाने यशस्वी ठरला.
तसेच फर्स्ट रँक मध्ये पार्थ बिजवे ,आर्यन भिवापुरे ,उत्कर्ष ढोमणे,चेतना डोईफोडे,पार्थ सिसाठ,मृणाली लुंगे,गुंजन दळवी,पूर्वेश लांडे,देवांशी सायरे, परी दापुरकर,संस्कृती करपे,प्रदुन्य
कुथे , आराध्या वानखडे,आरोही चौधरी,आनंदी चौधरी,अनुज नांदणे,अथर्व शहाणे,स्वराली लांडगे,भार्गवी रत्नपारखी,आर्यन गुळघाने ,खुशी बारमासे , रिया कडू,श्रध्दा निचत,वंश भुयार सक्षम तेलखेडे,यशस्वी शिरस्कर इत्यादी विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल मिळवून यश प्राप्त केले.
शाळा संस्थेचे अध्यक्ष अँड.रवींद्र गुरु, उपाध्यक्ष सुमेधजी धोंगडी,सचिव विजय सव्वालाखे ,सहसचिवआशिष मोहड ,डॉ.पराग बिजवे,डॉ.चंद्रशेखर पोतदार तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निलिमा ठाकरे व उपमुख्यध्यापिका वंदना लेकुरवाळे तसेच सर्व शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक करून अभिनंदन केले.