रसुलाबाद स्मशानभूमी च्या गेट ची कायमस्वरूपी उपाय योजना करा
नागरिकांची मागणी
रसुलाबाद/संदीप रघाटाटे:
पुलगाव मार्गावर असलेल्या हिन्दू स्मशानभूमी च्या लोखंडी गेट च्या वारंवार चोरट्यानी चोरून नेण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला पण ते त्या मध्ये यशस्वी झाले आहे तो लोखंडी गेट कधी खाली पडलेल्या, तर कधी तुटलेल्या अवस्थेमध्ये दिसून येत आहे त्यामुळे या चोरट्यावर पोलीस कारवाई करावी जनेकरून असे पुन्हा होणार नाही
पुलगाव मार्गावरील हिन्दू स्मशानभूमी च्या सौंदरीकरण येथील नागरिकांच्या व ग्रामपंचायत सदस्य संदीप नथीले , पोलीस पाटील शाम काकडे , विवेक भबुतकर, प्रफुल अनवणे याच्या सह अनेक नागरिकांनी या परिसरात आर्थिक व श्रमदान केले आणि या ठिकाणी नागरिकांना उन्हाळयात सावली साठी झाडे लावली ,लोखंडी गेट बसविला , नागरिकांना बसण्यासाठी बेच ची व्यवस्था करण्यात आली पण यातील लोखंडी गेट चोरट्यानी अनेक वेळा चोरून नेण्याचा प्रयत्न केला दुसऱ्या दिवशी तो तुटलेल्या अवस्थेत दिसून येत असतो त्यामुळे संदीप नथीले व व गावातील नागरिक तो दुरुस्त करीत असतात पण याकडे रसुलाबाद ग्रामपंचात चे दुर्लक्ष करीत असल्याने असे प्रकार होत असल्याचे ग्रामपंचयत सदस्य संदीप नथीले सह नागरिक करीत आहे
त्यामुळे त्या भीतीला चांगल्या प्रकारे लोखंडी अँगल लावून व होलपास बसून द्यावी आणि स्मशानभूमीत असलेल्या जागेत ब्लॅक (गट्टू) बसविण्यात यावे जनेकरून आत मधील भगत पावसाळ्यात चिखल होणार नाही आणि दुसऱ्या शेड वर टिनपत्रे टाकून देण्यात यावी त्यामुळे नागरिकांना सावली मध्ये बसता येईल अशी मागणी होत आहे