राज्य सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करते यामुळे मला आमदार असल्याची लाज वाटते – आमदार समीर कुणावार
शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या मागण्यांकरिता आमदार समीर कुणावार यांचे आमरण उपोषण सुरू
प्रतिनिधी / वर्धा :
हिंगणघाट समुद्रपुर सिंधी रेल्वे तसेच संपूर्ण वर्धा जिल्ह्यामध्ये विद्युत मंडळाने कुठलीही पूर्वसूचना न देता डीपीवरून शेकडो गावात शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे.
वर्धा जिल्हा आत्महत्याग्रस्त जिल्हा सध्या चना व गहू तसेच उन्हाळी भुईमूग, भाजीपाला तसेच ऊस पिकास इतर पिके शेतकऱ्यांच्या शेतात उभी आहेत.
सोयाबीन पिकांचे यापूर्वी दगा दिला अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे चना व गहू व इतर पिकाकरिता पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे तसेच चालू हंगामातील तुरीचे पीक करपा रोगामुळे या रोगांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तूर पिकाचे सर्वेक्षण करून मदत देण्याची आवश्यकता आहे.
विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांना विनवणी केली व यापूर्वी विधानसभेत सुद्धा प्रश्न उपस्थित केला ऊर्जामंत्री उपमुख्यमंत्र्यांना हा विषय गांभीर्याने घेण्याबाबत विनंती केली परंतु अद्याप तोडगा निघाला नाही.
शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे बील न देता पूर्वसूचना न देता जुन्या बिलाची मनमानी वसुली सुरू आहे तसेच रोज दहा ते पंधरा गावांमध्ये विद्युत मंडळाचे अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचे डीपी वरून सरसकट कनेक्शन कापण्याचा प्रकार आजही सुरू आहे .
शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळामध्ये मोठी रक्कम भरण्याचा तगादा लावला जात आहे हे अतिशय निषेधार्थ आले आहे.
मागील अधिवेशन काळामध्ये उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांना कृषी पंपाच्या वीज तोडणी बाबत प्रश्न उपस्थित केला असता उपमुख्यमंत्री एप्रिल 20 22 पर्यंत कुठल्याही शेतकऱ्यांचा कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित पुरवठा तोडला जाणार नाही याची खात्री दिली होती.
परंतु दिलेला शब्द न पाळल्यामुळे तसेच येत्या तीन दिवसात शेतकऱ्यांच्या विद्युत पुरवठा सरसगट सुरू न केल्यास नाईलाजास्तव मला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग स्वीकारला घेत याबाबत जिल्हाधिकारी यांना. 10 फेब्रुवारी ला निवेदन दिले असून त्यांना विद्युत विद्युत मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने प्रश्न निकाली लागावा याकरिता प्रयत्न करण्यास सांगितले परंतु आज पण कुठले तोडगा न निघाल्याने. हिंगणघाट समुद्रपुर विधानसभा क्षेत्रातील जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य, सरपंच तसेच पदाधिकाऱ्यांसोबत आज अखेर उपोषण सुरू करण्यात आले आहे. शासनाने तरी त्वरित तोडगा न काढल्यास आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला लागेल असे आमदार समीर कुणावर यांनी सांगितले पत्रकार परिषदेत सांगितले.