राष्टवादी अजित पवार गटाचे नेते,ओबीसी नेते,महाजोती चे माजी संचालक गमे चे अश्लील चाळे उजेडात…

0

🔥राकाँच्या नेत्याचे अल्पवयीन मुलीशी असभ्य वर्तन
पुलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.🔥हाच तो अश्लील चाळे करणारा राष्टवादी अजित पवार गटाचे नेते,ओबीसी नेते,महाजोती चे माजी संचालक दिवाकर गमे चे अश्लील चाळे आता उजेडात.🔥७८ वर्षीय प्रा. दिवाकर गमे ला पास्को गुन्ह्या प्रकरणात अटक.

🔥नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून मागील ५ वर्षा पासून या युवती सोबत केले अश्लील कृत्य

वर्धा -/ महाज्योतीचे माजी संचालक तथा राकाँ अजित पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष दिवाकर गमे (वय ७८) रा. हिंगणघाट यांच्याविरुद्ध पुलगाव पोलिसांनी पॉक्सो कायद्यासह इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली आहे. नोकरी मिळवून देण्याचे आमिष देत त्यांनी अल्पवयीन मुलीशी अनेक वर्षे असभ्य वर्तन केल्याचा आरोप तक्रारीतून कऱण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.दिवाकर गमे यांची हिंगणघाट तालुक्यात एक शैक्षणिक संस्था आहे. ते अनेक वर्षांपासून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद या संघटनेशी जोडलेले असून सध्या ते विदर्भ अध्यक्ष आहेत. याशिवाय त्यांनी महाज्योतीचे संचालक म्हणून कामही पाहिले आहे. जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोठे नाव आहे. अशा प्रतिष्ठित व्यक्तीवर गंभीर आरोप होत पॉस्को अंतर्गतगुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पुलगाव पोलिस ठाण्यात २१ वर्षीय पीडितेने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी दिवाकर गमे यांच्याविरुद्ध पॉक्सो आणि विनयभंगाच्या कलमांन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपी गमे यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. आरोपीची पीडितेच्या कुटुंबाशी चांगली ओळख होती. त्याच आधारावर पीडितेलाही आपल्या संस्थेत नोकरी देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. पीडितेने बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर नीटच्या कोचिंगच्या बहाण्याने आरोपीने तिला नाशिकला नेले होते. २०२१ पासून आरोपीकडून पीडितेचा छळ होत होता. आरोपीच्या वर्तनाला कंटाळून पीडितेने काही महिन्यांपासून आरोपीपासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली. तरीही तिला वारंवार कॉल करणे व अश्लील संदेश, चित्रफित पाठविण्यात आल्याचा आरोपही तक्रारीतून करण्यात आला आहे. पोलिसांनीही मोबाईल जप्त केला आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. वंदना कारखेले करीत आहेत.(क्रमशः)

            ब्युरो रिपोर्ट साहसिक      News-/24 पुलगाव,वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!