लता मंगेशकर यांचं निधन, नितीन गडकरींनी ‘या’ शब्दात केली घोषणा
वृत्तसंस्था / मुंबई :
लता दीदींच्या निधनाची सर्वप्रथम माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
नितीन गडकरी हे आज सकाळी मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात आले आणि रुग्णालय प्रशासनाशी चर्चा केली. त्यानंतर रुग्णालयाबाहेर येऊन लता दीदींच्या निधनाची माहिती दिली.
नितीन गडकरींनी माध्यमांशी बोलताना म्हटलं, “लता मंगेशकर यांच्या जाण्याने देशाची हानी झाली आहे. पिढ्यान् पिढ्या त्यांची गाणी लोक ऐकतील. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो ही प्रार्थना करतो. त्यांचं जाणं धक्का आहे. त्याला सहन करण्याची आपल्याला शक्ती मिळो.”