🔥शेतकरी गजानन होले यांच्याशी अधिकार्यांनी केले हितगुज.
आष्टी शहीद.-/ तालुक्यातील लहान आर्वी हे गाव संत्रा उत्पादन आणि कांदा उत्पादनासाठी वर्धा जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.लहान आर्वी हे गाव नागपुर विभागात कांद्याचे कोठार म्हणुन प्रसिद्ध आहे.
मात्र लहान आर्वी येथील शेतकरी गजानन आनंदराव होले यांनी चंदन शेती करून वेगळा आदर्श निर्माण केला आहे.शेतकरी गजानन आनंदराव होले यांनी त्यांच्या तीन एकर शेतीत ५५० चंदनाचे झाडे लावुन आणि त्या झाडांचे संगोपन करून आज तीन वर्षे पूर्ण केले आहे.यावरून विदर्भातही चंदन शेती होऊ शकतो हे शेतकरी गजानन होले यांनी कृषी विभागाला आणि तालुक्यातील शेतकर्यांना दाखवुन दिले आहे.शेतकरी गजानन होले यांच्या चंदन शेतीची कृषी विभागाला माहिती होताच त्यांच्या चंदन शेतीची कृषी विभागाने दखल घेऊन मौजा लहान आर्वी येथे गजानन होले यांच्या शेतात कृषी विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी रमाकांत कांबळे आणि तालुका कृषी अधिकारी शुभम बनकर यांनी नुकतीच भेट देऊन चंदन शेती बद्दल माहिती जाणुन घेतली व शेतकरी गजानन आनंदराव होले यांना चंदन शेती बद्दल उपयुक्त असे मार्गदर्शन केले.
यावेळी लहान आर्वी येथील कृषी सहाय्यक मिलींद पाटभाजे,आर्वी उपविभागीय कार्यालयातील संजय जायभाये,लहान आर्वी ग्रामपंचायतचे उपसरपंच अमोल होले,उद्योजक चंद्रकांत होले उपस्थित होते.
गजानन होले यांनी चंदन शेती यशस्वी करून दाखविल्या बद्दल त्यांचे आष्टी तालुक्यात कौतुक होत आहे.