🔥लाठी-काठी एक उत्तम पारंपारिक खेळ,इमरान राही विदर्भ स्तरीय लाठी चॅम्पियनशिप-२०२६ चे उद्घाटन.
वायगांव (निपानी) -/लाठी-काठी हा महाराष्ट्र राज्याचा एक पारंपारिक खेळ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हा खेळ संपुर्ण महाराष्ट्र लोकप्रिय आहे. पुर्वी हा खेळ लढाईचे कौशल्य शिकण्यासाठी आणि शारीरिक तंदुरूस्ती साठी खेळला जात होता. पण आजकाल हा खेळ स्पर्धेसाठी खेळला जातो. हा खेळ आत्मविश्वास आणि शिस्त वाढवण्यास मदत करतो. लाठी-काठी शारीरिक आणि मानसिक आरोग्यसाठी फायदेशीर आहे. हा एक उत्तम पारंपारिक खेळ आहे. असे प्रतिपादन युनिव्हर्सल मार्शल आर्ट अकादमीचे राष्ट्रीय सल्लागार इमरान राही यांनी व्यक्त केले.ते २९ मार्च राजी वायगांव (निपानी) येथील लक्ष्मीबाई सभागृहात लाठी असोशिएशन वर्धा जिल्हा व्दारा आयोजित विदर्भ स्तरीय लाठी चॅम्पियनशिप-२०२६ चे उद्घाटक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लाठी इंटरनॅशनल कौन्सिलचे सदस्य महागुरू सुभाष मोहिते, उद्घाटक इमरान राही तर प्रमुख अतिथी म्हणून लाठी इंडियन ऑर्गनायजेशनचे संचालक मोहम्मद रफीक, एल.टी.एस. कराटे डो. असोशिएशनचे राष्ट्रीय सचिव कोषी उल्हास वाघ, लाठी असोशिएशनचे कार्यअध्यक्ष किरण यादव, माजी सैनिक किशोर मुंगले, मेघराज रंगारी, रिजवान खॉन, डॉ. प्रविण करनाके, रमेश टिपले, मनोहर घोडस्वदि, विजय हातमोडे, ज्येष्ठ समाजसेवी राजु लभाणे, अंबादास नान्हे, रवि राठी, सेन्साई रमेश भगत, स्पर्धेचे आयोजक मार्शल गवळी, वर्धा जिल्हा लाठी असोशिएशनचे अध्यक्ष अभिजीत पारगांवकर, सचिव उमोल मानकर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
शिस्त, साहस, आणि कौशल्य यांचे उत्कृष्ट प्रदर्शन या स्पर्धेत पाहायला मिळेल अशी भावना कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष मोहिते यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मार्शल गवळी संचालन अमोल मानकर तर आभार अभिजीत पारगांवकर यांनी व्यक्त केले. या स्पर्धेत विदर्भातील विविध जिल्हयांमधून सुमारे २०० विद्याथ्यांनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रम यशस्वी साहिल वाघ, मिलिंद मानकर, हर्षाली चौधरी प्रांजली नागदेवे, आकाश कापसे, साहिल तराळे, दिव्यांनी विरूळकर, दीप्ती खडसे, वैभव सास्त्ररकर, नूतन तुरणकर साक्षी बावणे, शंतनू जाधव, सुरज बावणे, तेजस मांडवगडे, दिव्यांनी महाकाळकर, प्रतिक वानखेडे, सौरभ बावणे, वृषभबावणे, सौरभ मानकर, गौरव तामगाडगे, कार्तिक रोकडे, कल्याणी महाकाळकर, आरित मानकर श्री. राजेंद्र सोनवाणे, अमोल ठाकरे, वेदांत चौधरी यांनी अथक परिश्रम घेतले.