🔥लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राख्या बांधून दिला आभाराचा मान.
हिंगणा -/ येथे बुद्ध विहार, संजय नगर, एमआयडीसी हिंगणा रोडमुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना प्रतिमहिना पंधराशे रुपये आर्थिक सहाय्य मिळाले. या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी परिसरातील महिलांनी महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना राख्या बांधून आणि आभारपत्र देऊन धन्यवाद दिला.हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी बबन पडोळे, संदीप साबळे, रोहित शिंगणे, गजाननराव शिवरकर, गणेश नवघरे, सरोज रणदिवे तसेच परिसरातील लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, पंतप्रधान मातृ वंदना योजना, उज्वला योजना, आयुष्यमान भारत, जल जीवन मिशन, अन्नपूर्णा योजना, महिला सन्मान योजना, सुकन्या समृद्धी योजना, लेक लाडकी योजना, बेबी केअर किट योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना अशा अनेक शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.सर्व बहिणींनी या योजनांचा लाभ घ्यावा, हीअपेक्षा संदीप साबळे यांनी व्यक्त केली !