वर्धा जिल्ह्यातून निलेश बोबडे विद्यापीठस्तरीय उत्कृष्ठ रासेयो पुरस्काराने सन्मानीत
प्रतिनिधी/वर्धा
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने विद्यापीठस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून श्री. निलेश अनिलराव बोबडे यांना सन्मानित करण्यात आले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी, प्र-कुलगुरू डॉ.संजय दुबे, कुलसचिव डॉ.राजू हिवसे व रासेयो संचालक डॉ.सोपानदेव पिसे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यांत वर्धा शहरातील. श्रीकृष्णदास जाजू ग्रामीण सेवा महाविद्यालय पिपरी-वर्धा येथील विद्यार्थी निलेश बोबडे याने राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या माध्यमातून विविध स्तरावरील शिबिरे करून समाजामध्ये राष्ट्रीय एकात्मता, ग्राम-स्वच्छता अभियान, रक्तदान शिबीर, तुंबाखु व मद्यपान मुक्ती कार्यक्रम, मतदान जनजागृती कार्यक्रम, पथनाट्य लोकगीते सादर करून प्रबोधनातून समाजाची जनजागृती केली. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन नागपूर विद्यापीठाद्वारे त्यांना पुरस्काराने गौरवित करण्यात आले. महत्वाची बाब म्हणजे वर्धा जिल्ह्यातील ते या वर्षी चे एकमेव उत्कृष्ठ रासेयो स्वयंसेवक ठरले. पुरस्कार मिळाल्याबद्दल श्रीकृष्णदास जाजू ग्रामीण सेवा महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, रासेयो कार्यक्रम अधिकारी तसेच सर्व प्राध्यापक, कर्मचारी वृंद तर्फे अभिनंदन व कौतुक करण्यात आले
बिरो रिपोट
वर्धा.