🔥विदर्भातील इलेक्ट्रो होमिओपॅथी चिकित्सकांच्या उपस्थितीत डॉ. काउंट सीझर मॅटी यांची २१७ वी जयंती उत्साहात साजरी. ( नागपूर -/ इलेक्ट्रो होमिओपॅथी उपचारपद्धतीचे जनक Dr. Count Cesare Mattei यांची २१७ वी जयंती महाराष्ट्र इलेक्ट्रो होमिओपॅथी डॉक्टर असोसिएशनच्या वतीने व Ayushman Acupuncture College यांच्या आयोजनाखाली रविवार, दिनांक ११ जानेवारी रोजी नागपूर येथील KDK College च्या सभागृहात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमास विदर्भातील मोठ्या संख्येने इलेक्ट्रो होमिओपॅथी चिकित्सक उपस्थित होते. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चाललेल्या या कार्यक्रमात इलेक्ट्रो होमिओपॅथी चिकित्सा पद्धतीचा इतिहास, तिचा आधुनिक विकास, संघटनात्मक बळकटीकरण तसेच वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
आयोजक आयुष्मान अॅक्युपंक्चर कॉलेजचे संचालक डॉ. त्रिदीप गुहा यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ व ट्रॉफी देऊन स्वागत केले.समारंभाला मेडिकल असोसिएशन ऑफ इलेक्ट्रो होमिओपॅथीचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. नरेशचंद्र सोनभद्रे, विदर्भ अध्यक्ष राजू कान्हेरकर, इलेक्ट्रो होमिओपॅथीचे प्रसिद्ध चिकित्सक डॉ. रवी नितनवरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. संदीप खंगार, डॉ. मनोज कोपरणे, डॉ. रमेश पाटील, डॉ. महेंद्र शेगावकर, नंदकिशोर देशमुख, डॉ. किरण ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. त्रिदीप गुहा यांनी केले, संचालन राजू कान्हेरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन मिसेस गुहा यांनी मानले.या यशस्वी आयोजनासाठी आयुष्मान अॅक्युपंक्चर कॉलेजचे सर्व शिक्षक, चिकित्सक, विद्यार्थी व सहभागी यांनी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल आयोजकांनी त्यांचे आभार मानले.