सेलू -/विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी ची दुचाकीला ला जबर धडक दोन व्यक्ती किरकोळ जखमी झाल्याची घटना वर्धा – नागपूर महामार्गावर सेलू जवळ आनंद रेस्टारेंट समोर घडली मंगेश दामुजी सिरसागर वय ४० वर्ष रा.सेलू विशाल रगराव राऊत वय २१ वर्ष रा.गरमसूर असे दोन्ही किरकोळ जखमी झालेल्या दुचाकी चालकांचे नाव आहे.मिळालेल्या माहिती नुसार मंगेश सिरसागर आपल्या दुचाकी क्र. MH ४० ह २८६८ या दुचाकीने विरुद्ध दिशेने सेलू कडून वर्धे कडे जात होते. तर विशाल राऊत म्हणून ३२ AU २०७७ या क्रमांकाच्या दुचाकीने हा वर्धे वरून गरमसुर येथे जात होता दरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीची समोरा समोर धडक झाल्या मुळे दोन्ही दुचाकी स्वर किरकोळ जखमी झाले घटनेची माहिती रुग्णमित्र प्रज्वल लटारे यांना मिळताच त्यांनी दोन्ही जखमीला आपल्या रुग्णवाहिकेत ग्रामीण रुग्णालय सेलू येथे दाखल केले असता दोघाला ही ब्रेंड ला मार असल्या मुळे डॉक्टरांनी तात्पुरता उपचार करून कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम येथे प्रज्वल लटारे यांच्या रुग्णवाहिकेत पाठविले.