हिंगणघाट -/ वर्धा जिल्ह्यात प्रस्तावित शासकिय वैद्यकिय महाविद्यालय शहरातील उपजिल्हा रुग्णालय परिसरात सुरु करण्यात यावे या मागणीसाठी संघर्ष समितीच्या तीन महिला सोमवारपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
दरम्यान वेळा येथील संरक्षण समितीनेही वेळा येथे वैद्यकिय महाविद्यालय व्हावे म्हणुन काल पासून वेगळे सात दिवसीय धरणे आंदोलन पुकारले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा मुद्दा आता चिघळत असल्याचे दिसून येत आहे.वर्धा जिल्ह्याला मिळालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट येथे व्हावे, अशी संघर्ष समितीची मागणी आहे.
हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समिर कुणावार याचे विशेष प्रयत्नाने हिंगणघाट येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची ना. देवेंद्र फडणविस यांनी घोषणा केल्यानंतर पुन्हा एकदा जागेचा वाद निर्माण झाला आहे.
हिंगणघाट येथेच उपजिल्हा रुग्णालयामागे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची जागा निश्चित करण्यात यावी,या मागणीसाठी संघर्ष समितीच्या सुनिता तामगाडगे,सुजाता जीवनकर व सुजाता जांभुळकर या तीन महिलानी काल सोमवार पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले.
हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयामागे ४० एकर मोकळी जागा असल्याचा दावा संघर्ष समितीचेवतीने करण्यात येत असून त्याच ठिकाणी प्रस्तावीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय करण्यात यावे व तिच जागा वैद्यकिय महाविद्यालया साठी मंजूर करण्यात यावी, अशी मागणी उपोषणकर्त्या महिलांनी केली आहे.
दरम्यान आज दुपारी उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले तसेच तहसीलदार मासाळ यांनी उपोषणकर्त्या महिलांची तसेच संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, परंतु तोडगा निघाला नाही, संघर्ष समितीच्या महीलांनी जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देण्याची मागणी केली.
यावेळी माजी आमदार राजू तिमांडे,अतुल वांदिले,संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पिंपळकर,कार्याध्यक्ष वासुदेव पडवे,सुरेंद्र बोरकर,संदेश मुन, जगदीश वांदिले,रागिणी शेंडे, दिपाली रंगारी,सीमा तिवारी, सुनिता तळवेकर,लता सुकळकर, दिवाकर डफ,अमित रंगारी,जी. एन.नरांजे इत्यादी उपस्थित होते.
🔥वेळ्याच्या संरक्षण समितीचेही सात दिवसीय आंदोलन सुरु..
शहरात वैद्यकिय महाविद्यालयाचे जागा निश्चित करण्यासाठी शासकीय वैद्यकिय महविद्यालय संघर्ष समितीच्या महिलांचे आमरण उपोषण सुरु होताच वेळा येथील शासकिय वैद्यकिय महाविद्यालय संरक्षण समितीने वेळा येथील दान दिलेल्या जागेतच किंवा शासकीय जागेवरती शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व्हावे यासाठी वेगळ्या सात दिवसीय धरणे आंदोलनाला काल पासून येथील तहसिल कार्यालयासमोर सुरुवात करण्यात आली आहे.
हे धरणे आंदोलन २२ जुलै ते २८ जुलै असे सात दिवस चालणार आहे. शासकिय वैद्यकिय महाविद्यालया साठी वेळा येथील दान दिलेली जागा मल कन्स्ट्रक्शनने त्यांचेवर आरोप झाल्याने परत घेतलेली आहे.वेळा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाल्यास ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळेल त्यामुळे ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठी वेळा येथेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे असा निर्धार व्यक्त करीत या एक सप्ताहाच्या धरणे आंदोलनाला सुरूवात केली आहे.
मागणी मंजुर न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
या धरणे आंदोलनाच्या वेळी चंदू बोरकर, टिकाराम नौकरकर, बबन सायंकार, योगेश शेंडे,महादेव सायंकार,मधुसूदन सायंकार, संजय वैरागडे, दिनेश वैरागडे,वैभव बालपांडे, प्रवीण बोरकर, शुभम गोटे, हरिदास बोभाटे,सतीश सायंकार,किरण बोरकर,महेश मुडे, प्रफुल बेले,गुणवंत कामडी, मनोहर मेघरे, अनंता मेघरे,नागेश वासेकर, श्रावण खोब्रागडे,रवींद्र खोब्रागडे,अनिकेत विटाळे, अमित कुटे यांची उपस्थिती होती.