🔥शिवसेना शिंदे द्वारा नवनिर्वाचित नगराध्यक्ष व उपाध्यक्षाचा सत्कार.
हिंगणघाट -/येथील शिवसेना हिंगणघाट विधानसभा व्दारा शहरातील नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉ नयना उमेश तुळसकर व उपाध्यक्ष निलेश बाबाराव ठोंबरे यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शिवसेनेतर्फे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना शहराच्या विकासासाठी सहकार्य राहील व आपल्या नेतृत्वाखाली शहराची प्रगती कडे वाटचाल होईल अश्या शुभेच्छा देण्यात आल्या.
या सत्काराला उत्तर देताना नगराध्यक्षा डॉ नयना तुळसकर यांनी शहरातील विकासा कामामध्ये कोणतेही पक्षीय भेदाभेद करण्यात येणार नाही असे मत मांडले. तर सर्वाच्याच सहकार्याने हिंगणघाट विकास करू अशी आशा उपाध्यक्ष निलेश ठोंबरे यांनी व्यक्त केले.
या सत्कार प्रसंगी शिवसेना विधानसभा संघटक राजु हिंगमीरे, शिवसेना शहर संघटक सोनु लांजेवार, प्रतिक चाफले, हर्षल धार्मिक, राहुल तालेवार, भास्कर पेंदे, विलास हांडे (शहर उपाध्यक्ष), कुलभूषण वासनिक, सतिष तांबोळी, निखिल ढाले, अनिरूध्द जामगडे, अनिकेत लासटवार, पांडूरंग मुसळे, कैलाश ठाकुर, चैतन्य नारायणे, गणेश कोल्हे, संदिप गोतमारे तसेच शहर महिला आघाडी प्रमुख सुनिताताई तांबोळी, रजनीताई गोस्वामी, कांता झोरे, मंदाकीनी ढाले, विधी चौव्हान, कुंदा रोठे तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .