शिवाजी पार्कवर गुढीपाडव्याची जल्लोषमय सभा; राज ठाकरे यांचा कार्यकर्त्यांना दमदार संदेश, नागपूरहून शेकडोंची उपस्थिती.

0

🔥शिवाजी पार्कवर गुढीपाडव्याची जल्लोषमय सभा; राज ठाकरे यांचा कार्यकर्त्यांना दमदार संदेश, नागपूरहून शेकडोंची उपस्थिती.

मुंबई -/ गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभमुहूर्तावर मुंबईतील शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत राज्यभरातील जनतेला शुभेच्छा दिल्या. या वेळी शिवाजी पार्क परिसरात मोठ्या उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. राजसाहेब ठाकरे यांच्या भाषणात मराठी अस्मिता, राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि युवकांच्या भवितव्याबाबत महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले. त्यांच्या भाषणाला उपस्थित कार्यकर्त्यांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला.

या भव्य कार्यक्रमासाठी नागपूर जिल्ह्यातूनही शेकडो कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. आदित्य दुरुगकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली नागपूरहून आलेल्या कार्यकर्त्यांनी शिवाजी पार्कवर आपली उपस्थिती ठळकपणे दर्शवली. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असून घोषणाबाजी आणि जयघोषांनी परिसर दणाणून गेला होता.
या कार्यक्रमात कादिर महाजन, निलेश माहुलकर, अतुल बोरकुटे, आशिष शेटे , प्रविण वाघमारे, जयश्री चव्हाण, महेश राऊत, अर्निल पारखी दिपक ठाकरे, विठोबा भुरडे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. सर्वांनी एकत्र येत नववर्षाचे स्वागत केले आणि पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी एकजूट दर्शवली.

तसेच राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष गजानन ढाकुलकर आणि सिटी इंडियाचे सागर पडोळे यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावून घडामोडींचा आढावा घेतला. या कार्यक्रमामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात संघटनात्मक बळकटीसाठी प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

गुढीपाडव्याच्या या शुभदिनी झालेल्या या मेळाव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरणातही नव्या चर्चांना उधाण आले असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची ताकद दाखवणारा हा कार्यक्रम ठरल्याची चर्चा रंगत आहे.

          गजानन ढाकूलकर               साहसिक News-/24 मुंबई,नागपूर 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!