भिडी / वर्धा – नांदेड रेल्वे मार्गावर रेल्वे धावू लागली या मार्गाचे काम अपूरे झाल्याने संध्या रेल्वे कळंब पर्यंतच जात असल्याने प्रवाशांची ये-जा वर्दळ कमी प्रमाणात आहे.त्यामूळे रेल्वे स्टेशनवर सूनसान वातावरण दिसून येत आहे.याच वर्धा-नांदेड मार्गावर वर्धा रेल्वेस्टेशन वरून तिस-या क्रमांकावर भिडी रेल्वेस्टेशन आहे या रेल्वे स्टेशनवर जाण्याकरीता मात्र दोन किलोमिटर अंतर पार करावे लागतात हा दिलेला मार्ग चूकीचा असून. बसस्थानक पासून राष्ठीय महामार्गाच्या भूयारी मार्गा पासून भिडी -बाभूळगाव (खोसे ) शिवपांदन गेली आहे ती थेट स्टेशनवर पोचली या शिवपांदणीचे स्टेशन पर्यंतचे अंतर ५०० मिटर पर्यंतच येते या शिवपांदणीवर गर्भश्रीमंतानी अतिक्रमण करून आपल्या शेतात समाविस्ट केली आहे या शिवपांदनीवरिल अतिक्रमण काढून रेल्वे स्टेशन वर जाण्याकरीता पक्का रस्ता बनवावा या मार्गाचे रेल्वेस्टेशन व बसस्थानक हे हाकेच्या अंतरावर येईल तर सध्या केलेला मार्ग पूढेभविष्यात या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण होवून रेल्वे नांदेड पर्यंत धावल्यावर या भिडी रेल्वे स्टेशन वर प्रवाशांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढेल यात शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनी व महिला प्रवाशांना दोन किलोमिटर अंतरावरून भिडी येथे येताना घातक ठरेल असे वर्तविले जात आहे करिता रेल्वे स्टेशन कडे बसस्थानक परिसरातून गेलेल्या शिवपांदन मोकळी करून पक्का रस्त्यांची बांधुनी करावी अशी मागणी शालेय विद्यार्थी विद्यार्थीनी व महिला व ग्रामस्त करीत आहे.